Swadesh Art Festival : धांदरफळ बुद्रुक येथे ‘स्वदेश कला उत्सवा’ ने ग्रामविकासाचा जागर

Swadesh Art Festival : धांदरफळ बुद्रुक येथे 'स्वदेश कला उत्सवा' ने ग्रामविकासाचा जागर

0
Swadesh Art Festival : धांदरफळ बुद्रुक येथे 'स्वदेश कला उत्सवा' ने ग्रामविकासाचा जागर
Swadesh Art Festival : धांदरफळ बुद्रुक येथे 'स्वदेश कला उत्सवा' ने ग्रामविकासाचा जागर

Swadesh Art Festival : संगमनेर: ग्रामीण भागातील कलागुणांना वाव मिळावा आणि सामाजिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी, या उद्देशाने धांदरफळ बुद्रुक येथे आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ (Chief Minister Prosperous Panchayat Raj Campaign)‘स्वदेश कला उत्सव २०२६’ (Swadesh Art Festival) उत्साहात पार पडला. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची सांगता माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत झाली.

अवश्य वाचा : अहिल्यानगर मनपा निवडणूक : महायुतीचा ‘महाविजय’, तर दिग्गजांना पराभवाचा धक्का!

बाळासाहेब थोरात म्हणाले की,

या उत्सवाचे उद्घाटन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सांगता समारंभाप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, धांदरफळ बुद्रुक गावाने ग्रामविकासाची वेगळी दिशा दर्शविली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकोपयोगी उपक्रम राबवून या गावाने प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली आहे. श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानच्या विकासासोबतच बाळासाहेब देशमाने आणि ग्रामपंचायतीने ग्रामविकासाचा जो आदर्श ठेवला आहे, तो कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.

नक्की वाचा: अहिल्यानगरमध्ये विखे-जगताप मैत्रीचा मोठा विजय; महाविकास आघाडीचे पानीपत

महिलांसाठी विचारांचे व्यासपीठ (Swadesh Art Festival)

उत्सवादरम्यान राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, संत गाडगे महाराज आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांची जयंती साजरी करण्यात आली. केवळ मनोरंजन न करता, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण आणि शेतकरी पुत्रांच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या ‘नवरदेव’ या चित्रपटाचे प्रदर्शन करून जनजागृती करण्यात आली. स्वदेश महिला मंचाच्या वतीने ‘उत्सव स्त्री शक्तीचा’ अंतर्गत ‘लय भारी संगमनेरी होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. यामध्ये महिलांसाठी पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा करंडा, ओव्हन आणि गॅस शेगडी यांसारखी भरघोस बक्षिसे देण्यात आली. गप्पा, उखाणे आणि खेळांच्या माध्यमातून महिलांना विरंगुळा व विचारांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

Swadesh Art Festival : धांदरफळ बुद्रुक येथे 'स्वदेश कला उत्सवा' ने ग्रामविकासाचा जागर
Swadesh Art Festival : धांदरफळ बुद्रुक येथे ‘स्वदेश कला उत्सवा’ ने ग्रामविकासाचा जागर

सुशिक्षित बेरोजगार आणि बचत गटांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. बँकांमार्फत कर्ज वितरण आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले, ज्यामुळे तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेवर आधारित स्वामीराज भिसे आणि रुचिका खोत यांचा ‘वारी आडवाटांच्या विठोबाची कीर्तावणी’ हा नाट्यप्रयोग सादर झाला. या प्रयोगाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गप्पागोष्टी, गाणे, खेळ, नृत्य, उखाणे याशिवाय महिलांसाठी मनोरंजनाचे आणि विचारांचे व्यासपीठ निर्माण करणारा उपक्रम घेऊन विचाराचे तिळगुळ देऊन हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम पार पडला. तसेच गावातील भूमिपुत्रांच्या कलागुणांचा ‘स्वदेश कला गौरव सन्मान २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. उद्धव चंद्रभान गोर्डे यांना कृषी, दुग्ध व्यवसाय व आदर्श कुटुंब, संपत वाकचौरे यांना पारंपारिक लाकडी कला व बाळासाहेब भाऊराव देशमुख (टेलर बाबा) यांना ६० वर्षांपासून पारंपारिक शिवणकला (धोतर शिवणकाम) यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच ग्रामविकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंच उज्वलाताई देशमाने व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवाभावी संस्था यांच्या कार्याला शाबासकी देण्याकरिता मकर संक्रांतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो.

हे देखील वाचा: महायुतीत लहान-मोठा भाऊ कोण? गुगली प्रश्नावर विखेंचं उत्तर

या सोहळ्यासाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कांचन थोरात, पांडुरंग घुले, रामहरी कातोरे , बाळासाहेब देशमुख , अनिल देशमुख, खंडू सातपुते, सतीश खताळ ,अरुण वाकचौरे, डॉ. जयश्री थोरात, लताताई कातोरे ,उज्वला देशमाने, संगीता देशमाने, सुनीता कोडे , सुरभी पवार, गोकुळ राहणे, वंदना राहणे, महिलांसाठी प्रशिक्षण उद्योजक कोमल उगले, सारिका परदेशी, प्रिया म्हस्के, विविध बचत गटातील महिला मंडळ , रामेश्वर देवस्थान अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळ, सदस्य, युवा प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार , ग्रामपंचायत सर्व सदस्य मंडळ, ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक, धांदरफळ पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सर्व संस्थांचे पदाधिकारी, हरिभक्त परायण स्वामीराज भिसे, रुचिका खोत, सर्व पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी तर आभार प्रदर्शन नवनाथ देशमाने यांनी केले.