Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती अस्वस्थ, निवडणुकीत धावपळ झाल्याचा परिणाम

0
Eknath Shinde:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती अस्वस्थ, निवडणुकीत धावपळ झाल्याचा परिणाम
Eknath Shinde:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती अस्वस्थ, निवडणुकीत धावपळ झाल्याचा परिणाम

नगर: महाापालिका निवडणुकीत (Municipal Election) जास्त धावपळ झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती अस्वस्थ (Unwell) झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम राखीव ठेवले असल्याची माहिती आहे. प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे हे कॅबिनेटच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. तशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कल्पना दिली होती अशी माहिती आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये गेल्या महिनाभरात एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यभरात सभांचा धडाका लावला होता. राज्यातील सर्व प्रमुख महापालिकांमध्ये त्यांनी सभा घेतल्या. या दरम्यान झालेल्या धावपळीमुळे एकनाथ शिंदेंची प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी घडामोड, भरारी पथकाने वॉशिंग मशीनने भरलेला ट्रक पकडला  

एकनाथ शिंदे कॅबिनेटला गैरहजर (Eknath Shinde)

एकनाथ शिंदे तब्येत बरी नसल्याने आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. मुख्यमंत्र्यांना त्यांनी याची आधीच कल्पना दिली होती. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता.त्यामुळे शनिवारी दिवसभरातील सर्व कार्यक्रम शिंदेंनी राखीव ठेवल्याची माहिती आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिले. बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम असल्याने अजित पवार हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला येऊ शकले नसल्याची माहिती आहे.

अवश्य वाचा: अखेर झेडपी अन् पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा;५ फेब्रुवारीला मतदान,अहिल्यानगरमध्ये मात्र दुसऱ्या टप्प्यात निवडणुका

मनपा निवडणुकीनंतर शिंदेंचा वेगळा प्लॅन (Eknath Shinde)

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी एक खास प्लॅन केला आहे. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. सत्तास्थापनेच्या दिवसापर्यंत एका फाईल्ह स्टार हॉटेलमधे नवनिर्वाचित नगरसेवकांना ठेवले जाणार आहे.