Adv. Subhash Kakade : योग्य ध्येय बाळगून चिकाटीने परिश्रम घ्या; यश तुमच्या पायाशी लोळेल : ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुभाष काकडे

Adv. Subhash Kakade : योग्य ध्येय बाळगून चिकाटीने परिश्रम घ्या; यश तुमच्या पायाशी लोळेल : ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुभाष काकडे

0
Adv. Subhash Kakade : योग्य ध्येय बाळगून चिकाटीने परिश्रम घ्या; यश तुमच्या पायाशी लोळेल : ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुभाष काकडे
Adv. Subhash Kakade : योग्य ध्येय बाळगून चिकाटीने परिश्रम घ्या; यश तुमच्या पायाशी लोळेल : ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुभाष काकडे

Adv. Subhash Kakade : नगर : महाविद्यालयीन जीवन हे आयुष्याचे महत्वाचे वळण आहे. म्हणून योग्य ध्येय बाळगून चिकाटीने परिश्रम घ्या. यश तुमच्या पायाशी लोळेल. सारडा महाविद्यालयामधील (Pemraj Sarda College) शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण पाहून समाधान वाटते. स्नेहसंमेलनाचे दिवस हे अभ्यासाच्या ताणतणावातून काहीसा दिलासा देणारे असतात. सारडा महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ व सेन्ट्रल बार असोसिएशनचे (Central Bar Association) माजी अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे (Adv. Subhash Kakade) यांनी केले.

अवश्य वाचा: तारकपूर येथील विराज कॉलनीत घरफोडी करणारा जेरबंद; १९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

प्राध्यापक विविध पुरस्कारांनी सन्मानीत

पेमराज सारडा महाविद्यालय स्नेहसंमेलन व वार्षिक परितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. किशोर देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष स्थानाहून ॲड. सुभाष काकडे बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी न्यूरोलॉजीस्ट डॉ.हर्षवर्धन तन्वर, हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी, महाविद्यल्याचे अध्यक्ष डॉ.पारस कोठारी, प्रशासकीय अधिकारी ॲड. अनंत फडणीस व सुमतीलाल कोठारी, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, संचालिका प्रा.ज्योती कुलकर्णी, जगदीश झालानी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित, प्रा.अपर्णा शेपाळ आदींसह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार प्रा.सत्यजित पाटील व प्रा.स्मिता भुसे यांना तर उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारीचा पहिला पुरस्कार भाग्यश्री कुलकर्णी यांना देण्यात आला.

नक्की वाचा: महापालिकेत आता पाच ऐवजी सहा स्वीकृत सदस्य!

ॲड. किशोर देशपांडे म्हणाले, (Adv. Subhash Kakade)

सारडा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याने या संस्थेशी ऋणानुबंध जुळले आहेत. महाविद्यालयाची झालेली प्रगती ही अभिमानास्पदच आहे. महाविद्यालयीन शिक्षण हे करियर करण्याचे असल्याने विद्यार्थ्यांनी याकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन केले.

डॉ.हर्षवर्धन तन्वर म्हणाले, महाविद्यालयात प्राध्यापकांकडून मिळणाऱ्या ज्ञानाचा लाभ घेऊन आपल्या नगरचे व देशाचे नाव उंचावण्यासाठी काम करावे. यशापयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच पण त्यातच उज्वल करीयरच्या संधी लपलेल्या असतात. त्यामुळे अपायाशाने खचून जाऊ नका, असे आवाहन केले. यावेळी संजय जोशी, डॉ.पारस कोठारी यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा गोषवारा मांडला.

हे देखील वाचा: मुंबई महापालिका महापौर पदासाठी हालचालींना वेग;शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

यावेळी विविध विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय स्तरावर यशस्वी झालेल्या विद्याथ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्नेहसंमेलनात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, अभिनय, गायन आदी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रबंधक अशोक असेरी, उपप्राचार्य मिलिंद देशपांडे, गिरीश पाखरे, पर्यवेक्षक डॉ.सुजित कुमावत, महेश कुलकर्णी व डॉ.राजू रिक्कल उपस्थित होते.