Mayoral Election:महापौर पदाची निवड नेमकी कशी होते ? जाणून घ्या सविस्तर…  

0
Mayoral Election:महापौर पदाची निवड नेमकी कशी होते ? जाणून घ्या सविस्तर...  
Mayoral Election:महापौर पदाची निवड नेमकी कशी होते ? जाणून घ्या सविस्तर...  

नगर : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल (Municipal Election Results) १६ तारखेला जाहीर झाले. त्यात बऱ्याच महापालिकेत महायुतीतील (Mahayuti)पक्ष सरस ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. मात्र महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता नवा महापौर (New Mayor) नेमका कधी आणि कसा निवडला जाणार? तसेच याबाबतची नावं कधी समोर येणार ? असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहेत. आता महापौर कोण होणार यासाठी सोडतीची प्रक्रिया (Release Process) पूर्ण झाल्यानंतरच राजकीय पक्षांकडून उमेदवार ठरवला जातो. महापौर निवडीसाठी सोडतीची प्रक्रिया राज्य सरकारकडून केली जाते. त्यासंदर्भातील अधिसूचना (Notification) निघाल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू होईल.

नक्की वाचा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती अस्वस्थ, निवडणुकीत धावपळ झाल्याचा परिणाम  

कशी होते महापौराची निवड ? (Mayoral Election)

महापालिकेच्या महापौरांची निवड ही थेट जनतेतून होत नाही. त्यासाठी एक विशिष्ट निवड प्रक्रिया पार पाडली जाते. नगर विकास विभागाकडून महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यासाठी नोटीफिकेशन काढलं जातं. त्यानुसार सर्व महापालिकेतील महापौर पदासाठी सोडत काढण्यात येते. या सोडतीमध्ये खुला प्रवर्ग, राखीव, महिला अशा प्रकारच्या वर्गांचा समावेश असतो. ज्या ठिकाणी जी सोडत निघते, त्यानुसार महापौर पदाची निवड केली जाते.

जसं मुंबईत ज्या पक्षाकडं किंवा युतीकडं ११४ पेक्षा जास्त नगरसेवक आहेत, त्यांचाच महापौर निवडला जातो. हे पद खुल्या प्रवर्गासाठी आहे की राखीव, हे या सोडतीवरून स्पष्ट होते. त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरले जातात आणि महापालिकेच्या सभागृहात मतदान होऊन नव्या महापौरांची घोषणा केली जाते. महापौर पदासाठीची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही अधिसूचना काढल्यानंतर सोडतीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत होईल असं काही नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर महापौर पदासाठी नावे दिली जातील.

अवश्य वाचा: अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार   

अहिल्यानगरमध्ये परिस्थिती काय ? (Mayoral Election)

अहिल्यानगर शहरात देखील महापौर पदासाठीची कोणतीही अधिसूचना न निघाल्याने अजून कोणत्याही पक्षात महापौर पदासाठीचं कोणतंही नाव समोर आलं नाही. अहिल्यानगरमध्ये मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये युती झाली होती. तसेच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने  यामध्ये जास्त जागा मिळविल्या आहेत. त्यामुळे आता महापौर नेमका कोणत्या पक्षाचा होणार याची देखील उत्सुकता नगरकरांना लागलेली आहे.