Balrangbhumi Parishad : बालरंगभूमी परिषदेच्या संस्थापक अध्यक्षा उर्मिला सतीश लोटके यांचे निधन

Balrangbhumi Parishad : बालरंगभूमी परिषदेच्या संस्थापक अध्यक्षा उर्मिला सतीश लोटके यांचे निधन

0
Balrangbhumi Parishad : बालरंगभूमी परिषदेच्या संस्थापक अध्यक्षा उर्मिला सतीश लोटके यांचे निधन
Balrangbhumi Parishad : बालरंगभूमी परिषदेच्या संस्थापक अध्यक्षा उर्मिला सतीश लोटके यांचे निधन

Balrangbhumi Parishad : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील बालरंगभूमी परिषद (Balrangbhumi Parishad), अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या संस्थापक अध्यक्षा उर्मिला सतीश लोटके (Urmila Satish Lotke) (वय ४७ वर्षे) यांचे अल्प आजाराने सोमवारी (ता. १९) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रावर (Theatre and Cultural Sector) शोककळा पसरली आहे.

नक्की वाचा: महापालिकेत आता पाच ऐवजी सहा स्वीकृत सदस्य!

राज्य नाट्य स्पर्धांमध्ये दिग्दर्शन, नाट्य समीक्षण

नाट्य, सांस्कृतिक व बालरंगभूमी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या स्व. उर्मिला लोटके या मूळच्या राज्यस्तरीय खेळाडू होत्या. त्यांनी बी.पी.एड.चे शिक्षण पूर्ण केले असून नाट्यशास्त्रातही पदवी प्राप्त केली होती. राज्य नाट्य स्पर्धांमध्ये दिग्दर्शन, नाट्य समीक्षण व उत्कृष्ट नाट्यनिर्मितीची अनेक पारितोषिके त्यांनी मिळवली होती. बालरंगभूमीच्या जडणघडणीत सर्वस्व झोकून देत त्यांनी स्वतः स्पर्धांमध्ये सहभाग घेत राज्यस्तरीय बाल राज्यनाट्य दिग्दर्शनाचे पारितोषिक ही पटकावले होते.

हे देखील वाचा: मुंबई महापालिका महापौर पदासाठी हालचालींना वेग;शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

बाल नाट्य करंडक स्पर्धेत मोलाचा सहभाग (Balrangbhumi Parishad)

सुमारे पंधरा वर्षे त्यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक महोत्सवात परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच जिल्हा परिषद बाल नाट्य करंडक स्पर्धेतही त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला होता. लहान मुलांसाठी बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून संस्कार शिबिरे, नाट्य प्रशिक्षण, नाट्यछटा स्पर्धा, लोककला महोत्सव, दिव्यांग मुलांसाठी विशेष महोत्सव तसेच बाल नाट्यशाळा असे विविध उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले. त्यांच्या निधनाने बालरंगभूमीवर मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना अनेक रंगकर्मी व सांस्कृतिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या मूळ गावी खंडाळा येथे मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


स्व. उर्मिला लोटके या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किसनराव लोटके यांच्या स्नुषा, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबईचे कोषाध्यक्ष सतीश लोटके यांच्या त्या पत्नी होत. अंत्यसंस्कारप्रसंगी आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, नाट्य परिषद नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, नियामक मंडळ सदस्य क्षितीज झावरे, प्रा. रवींद्र काळे, अनंत जोशी, मोहिनीराज गटणे, पी. डी. कुलकर्णी, शशिकांत नजान, ॲड. दीपक शर्मा, प्रसाद भणगे, अविनाश कराळे, सुधीर लांडगे, नगरसेवक बाळासाहेब पवार, विजय गव्हाळे, नितीन जगताप, प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, संदेश कार्ले यांच्यासह खंडाळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद तसेच शहर व जिल्ह्यातील कलाकारांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.