Chain Snatching : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील कापूरवाडी येथील प्रसिध्द मिरावली बाबा दर्गाह (Mirawali Baba Dargah) परिसरात दर्शनासाठी आलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याची सोन्याची चैन (Chain Snatching) आणि दीड हजार रूपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा: भारतीय सैन्य, वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाचविले १२ ट्रेकर्सचे जीव
गर्दीचा फायदा घेत अत्यंत शिताफीने चोरी
भावना मोतीलाल ककरा (वय ६४, रा. सुखवानी निकेतन, पिंपरी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी भावना ककरा या रविवारी (ता. १८) दुपारी दर्शनासाठी मिरावली बाबा दर्गाह परिसरात आल्या होत्या. दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ककरा यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि लॉकेट अत्यंत शिताफीने चोरले.
हे देखील वाचा: मुंबई महापौरपदाची निवड; बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार?
भिंगार पोलिसांची घटनास्थळी भेट (Chain Snatching)
दागिन्यांसोबतच त्यांच्या पर्समधील दीड हजार रूपये रोख रक्कमही लंपास करण्यात आली आहे. एकूण ६१ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. चोरी झाल्याचे लक्षात येताच भावना ककरा यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. भिंगार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून भावना ककरा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दिलीप झरेकर करीत आहेत.



