AMC : नगर : अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक (Ahilyanagar Municipal Corporation election) नुकतीच पार पडली. ६८ जागांसाठी तब्बल २७८ उमेदवार (Candidate) रिंगणात उतरले होते. त्यापैकी तब्बल १४९ जणांना पराभवासोबतच आर्थिक धक्काही सहन करावा लागला. किमान मतेही (Vote) न मिळाल्याने या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
नक्की वाचा: भारतीय सैन्य, वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाचविले १२ ट्रेकर्सचे जीव
इतकी होती अनामत रक्कम (AMC)
महापालिका निवडणुकीत सर्वसाधारण उमेदवारासाठी ५ हजार, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्व प्रवर्गातील महिलांसाठी २ हजार ५०० रुपये अनामत रक्कम नामनिर्देशन पत्रासोबतच भरली होती.
हे देखील वाचा: मुंबई महापौरपदाची निवड; बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार?
७३ महिला तर ७६ पुरुष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त (AMC)
महापालिका निवडणूक रिंगणात एकूण २८३ उमेदवार होते. यापैकी ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे २७८ उमेदवारांमध्ये निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार) एका उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. भाजपाच्या एकाही उमेदवाराने अनामत रक्कम गमावली नाही. तर विरोधी आघाडीतील उद्धवसेना १८, राष्ट्रवादी शरद पवार १८ तर काँग्रेसच्या ४, अपक्ष ७३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. १४९ पैकी ७३ महिला तर ७६ पुरुष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.



