Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील या प्रभागात नोटाला मतदारांची पसंती

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील या प्रभागात नोटाला मतदारांची पसंती

0
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील या प्रभागात नोटाला मतदारांची पसंती
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील या प्रभागात नोटाला मतदारांची पसंती

Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : निवडणुकीत उमेदवारांवर नाराजी व्यक्त करण्याचा एक पर्याय निवडणूक आयोगाने (Election Commission) मतदार राजाला दिला आहे. अन् तो पर्याय म्हणजे नोटा. म्हणजे पैसे नाही बरं का? नोटा (None of the Above) म्हणजे वरील एकही उमेदवाराचा पर्याय योग्य वाटत नसल्याचे मतदार यंत्रातील बटण. हे बटण अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election ) बऱ्याच मतदारांनी दाबून आपला रोष व्यक्त केला. या निवडणुकीत (Election) नोटाला किती मतांचे दान पडले आणि नोटाला कोणत्या प्रभागात जास्त मते मिळाली चला जाणून घेऊ…

नक्की वाचा: भारतीय सैन्य, वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाचविले १२ ट्रेकर्सचे जीव

नोटाला सुमारे ९ टक्के मतदान

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत आपल्या प्रभागातील एकही उमेदवार पसंत नसल्याने एकूण १८ हजार ३७२ मतदारांनी ‘नोटा’ (NOTA) हा पर्याय निवडला आहे. झालेल्या एकूण मतदानाच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे ९ टक्के आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 2 क मध्ये सर्वाधिक 756 मतदारांनी ‘नोटा’ चा पर्याय निवडला. तर प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ 107 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.

हे देखील वाचा: मुंबई महापौरपदाची निवड; बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार?

कुणालाही मत द्यायचे नसेल, तर ही व्यवस्था (Ahilyanagar Municipal Corporation Election)

निवडणुकीत तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार आवडत नसेल आणि तुम्हाला त्यांच्यापैकी कुणालाही मत द्यायचे नसेल, तर तुम्ही काय कराल? त्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यवस्था केली आहे. त्यावेळी तुम्ही NOTA बटण दाबून तुमचा निषेध नोंदवू शकता. आता तुमच्याकडे निवडीमध्ये एक पर्याय उपलब्ध आहे की, तुम्ही ‘यापैकी काहीही नाही’ म्हणजेच ‘None of the Above’ बटण दाबू शकता. NOTA बटण दाबणे म्हणजे निवडणूक लढवणारा एकही उमेदवार तुमच्या मते पात्र नाही. जेव्हा आपल्या देशात NOTA प्रणाली नव्हती, तेव्हा मतदार निवडणुकीत मतदान न करून आपला निषेध नोंदवत असत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मतदारांची मते वाया जात होती. यावर उपाय म्हणून निवडणूक प्रक्रिया आणि राजकारणात सुसूत्रता राखता यावी म्हणून NOTA चा पर्याय देण्यात आला.

यावर्षी झालेल्या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतही अनेक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडत आमच्या प्रभागातील एकही उमेदवार पात्र नसल्याचे दाखवून दिले. प्रभाग क्रमांक 2 क मध्ये तर तब्बल 756 मतदारांनी नोटाला मतदान करत आपला रोष व्यक्त केला. तर प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये केवळ107 मतदारांनी नोटाला मतदान केले. 2013 पासून न्यायालयाच्या आदेशानुसार मतदारांना NOTA चा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांचे मत वाया जात नाही, तसेच नोटाचा पर्याय स्वीकारुन मतदार उमेदवारांवरील आपला राग व्यक्त करतात.