Shiv Panand Roads : पीडित शेतकऱ्यांना शेत शिव पाणंद रस्ते खुले करून द्या; तहसीलदारांकडे मागणी

Shiv Panand Roads : पीडित शेतकऱ्यांना शेत शिव पाणंद रस्ते खुले करून द्या; तहसीलदारांकडे मागणी

0
Shiv Panand Roads : पीडित शेतकऱ्यांना शेत शिव पाणंद रस्ते खुले करून द्या; तहसीलदारांकडे मागणी
Shiv Panand Roads : पीडित शेतकऱ्यांना शेत शिव पाणंद रस्ते खुले करून द्या; तहसीलदारांकडे मागणी

Shiv Panand Roads : श्रीरामपूर: महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री बळीराजा शेत शिव पाणंद रस्ता (Shiv Panand Roads) या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले. सदर योजनेत जमीन महसूल अधिनियम 143 व 5/2 नुसार रस्ता पीडित शेतकऱ्यांना शेत शिव पाणंद रस्ते शासनामार्फत (Government) खुले करून देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील शेत रस्ता पीडित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय श्रीरामपूर (Shrirampur) येथे आपले लेखी तक्रार अर्ज दाखल करून त्याची पोहोच घ्यावी, सदर योजनेत शासनामार्फत रस्ते खुले करून देण्यात येणार आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

नक्की वाचा: भारतीय सैन्य, वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने वाचविले १२ ट्रेकर्सचे जीव

पीडित शेतकऱ्यांनी संघटनेशी संपर्क साधाण्याचे आवाहन

मुख्यमंत्री बळीराजा शेत शिव पाणंद रस्ता श्रीरामपूर तालुका समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आमदार हेमंत ओगले यांनाही सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत निवेदन देण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेकडून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी व या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्याला मिळेपर्यंत अखंड पाठपुरावा करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील शेत शिव पाणंद रस्ता पीडित शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: मुंबई महापौरपदाची निवड; बहुमत असूनही भाजप-शिंदे नाही तर ठाकरेंचा महापौर होणार?

शेत रस्ता पीडित शेतकरी उपस्थित (Shiv Panand Roads)

याप्रसंगी शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाअध्यक्ष निलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे ,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे, आशा शिंदे ,तालुकाअध्यक्ष प्रकाश जाधव ,मधुकर काकड,श्रीराम त्रिवेदी ,अशोक आव्हाड,अंबादास गमे,राजेंद्र चोरमल, भास्कर गायधने, राजेंद्र म्हैस, पावलस बार्से ,अंबादास चोरमल, अशोक बनकर आदींसह तालुक्यातील शेत रस्ता पीडित शेतकरी उपस्थित होते.