Kidnapping : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnapping) करून तिच्यासोबत अनैतिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या (Minor girl) वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला; तरुण गंभीर जखमी
बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेले
किरण बापू दरेकर, हर्षल संतोष मुरूमकर, सर्वोजित दत्तात्रय मुरूमकर (तिघे रा. कोयाळ, ता. आष्टी, जि. बीड) व आदित्य अनिल वामन (रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अहिल्यानगर तालुक्यातील एका गावातील विद्यालयासमोर सोमवारी (ता.१९) त्यांची मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत उभी होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या किरण दरेकर आणि हर्षल मुरूमकर यांनी तिला अनैतिक कृत्याच्या उद्देशाने गाठले. पीडितेच्या हाताला धरून तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून एका गावाच्या दिशेने पळवून नेले. या गुन्ह्यात त्यांना सर्वोजित मुरूमकर आणि आदित्य वामन यांनी प्रोत्साहन देत साथ दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील या प्रभागात नोटाला मतदारांची पसंती
चौघांविरूध्द अपहरण, विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल (Kidnapping)
दरम्यान, अपहरण केल्यानंतर पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने घाबरलेल्या संशयित आरोपींनी तिला पुन्हा विद्यालयासमोर आणून सोडले आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द अपहरण, विनयभंग, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेचा पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे अधिक तपास करत आहेत.
हे देखील वाचा: समाधान सरवणकरांचे भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप



