Shri Gorakshnath Gad : नगर : श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडाच्या (Shri Gorakshnath Gad) माध्यमातून धार्मिकतेचा वारसा जोपासला जात आहे. हे निसर्गरम्य स्थळ भक्तांना समाधान व आनंद देणारे आहे. मनुष्याला जिवंतपणी स्वर्ग पाहायचा असेल, तर गोरक्षनाथ गडावर येणे आवश्यक आहे. संत निळोबारायांच्या अभंगातून देवाची आवड काय आहे, हे समजते. देवाला भाव महत्त्वाचा आहे. सध्या काही महाराज लोक वारकरी संप्रदायाची (Varkari Sampradaya) मोडतोड करत आहेत. ही मोडतोड थांबवणे आवश्यक आहे. समाजाने एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. अहंकार जवळ ठेवू नका, भजन-कीर्तनातून आनंद घ्या. कीर्तनातून मनुष्य घडतो, म्हणून वारकरी संप्रदाय जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन संतोष महाराज वनवे (Santosh Maharaj Vanve) यांनी केले.
नक्की वाचा :जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला; तरुण गंभीर जखमी
गडावर धर्मनाथ बीज उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथील श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर भाविकांनी दर्शन, अभिषेक, नामस्मरण आणि किर्तनाचा लाभ घेत गोरक्षनाथ महाराजांच्या कृपेचा अनुभव घेतला. नाथसंप्रदायात धर्मनाथ बीजाला अत्यंत धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. याच दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास नाथसंप्रदायाची दीक्षा दिली आणि भक्तांना आदेश दिला की हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज उत्सव म्हणून साजरा करावा. या दिवशी उत्सव साजरा केल्याने दुःख, दारिद्र्य आणि संकटे दूर होतात, लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि जीवनात सुख, समृद्धी व आनंद प्राप्त होतो, अशी श्रद्धा भक्तांमध्ये आहे.
हे देखील वाचा: समाधान सरवणकरांचे भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप
भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन (Shri Gorakshnath Gad)
उत्सवानिमित्त पहाटे श्री गोरक्षनाथ महाराजांचा अभिषेक (महापूजा) पार पडली. कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत गोरक्षनाथ गड परिसरात भक्तीभाव, भजन-नामस्मरण आणि सत्संगाचे वातावरण अनुभवास आले. गोरक्षनाथ गडाची भूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून, या दिवशी संपूर्ण परिसरात “जय गोरक्षनाथ”, “जय धर्मनाथ” या जयघोषांनी वातावरण भक्तिमय झाले. भक्तांनी अभिषेक, दर्शन, नामस्मरण आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. स्थानिक ग्रामस्थ, वारकरी संप्रदायाचे सदस्य आणि दूरदूरहून आलेले भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले.



