
Local Crime Branch : नगर: मिरजगाव व खर्डा पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transport) करणारे चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल ८२ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सात जणांविरुद्ध मिरजगाव पोलीस ठाण्यात (Mirajgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील या प्रभागात नोटाला मतदारांची पसंती
गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नाव
संदीप अशोक जाधव (वय- २७, रा.खडकत, ता. आष्टी, जि.बीड), नितीन केरबा कापरे वय- ३१ रा. नागलवाडी ता.कर्जत, जि. अहिल्यानगर), अलम निजामुद्दीन शेख (वय- ३० रा. बडाअरा बुजुर्ग, ता.तमकोहीराज, जि. देवरीया उत्तर प्रदेश हल्ली रा. नागलवाडी, ता. कर्जत) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अजय खेडर (पुर्ण नांव माहिती नाही), ऋषिकेश खेडकर (पुर्ण नांव माहित नाही) दोघे रा. सांगवी ता.आष्टी, जि.बीड), संभाजी बाबुराव बांदल रा.नागलवाडी ता. कर्जत)(पसार) धनंजय बांदल (पुर्ण नांव माहित नाही) रा.नागलवाडी ता.कर्जत जि. अहिल्यानगर),योगेश अण्णा सुरवासे (वय- २८ रा. खर्डा ता.जामखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
हे देखील वाचा: समाधान सरवणकरांचे भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप
सापळा रचून आरोपीस घेतले ताब्यात (Local Crime Branch)
तर दुसरी कारवाई खर्डा पोलीस ठाणे हद्दीतील करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार मिरजगाव परिसरात अवैध वाळू उपसा होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले त्यांच्याकडून तब्बल ८२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत मिरजगाव पोलीस ठाणे तसेच खर्डा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर यांच्या पथकाने केली.


