Zakir Khan: स्टॅन्डअप कॉमेडियन झाकीर खानचा मोठा निर्णय;पुढील ५ वर्ष ब्रेक घेणार  

0
Zakir Khan: स्टॅन्डअप कॉमेडियन झाकीर खानचा मोठा निर्णय;पुढील ५ वर्ष ब्रेक घेणार  
Zakir Khan: स्टॅन्डअप कॉमेडियन झाकीर खानचा मोठा निर्णय;पुढील ५ वर्ष ब्रेक घेणार  

नगर: स्टॅन्डअप कॉमेडीच्या (Stand-up Comedy) विश्वातील प्रसिद्ध असलेलं नाव म्हणजे स्टॅन्डअप कॉमेडीयन झाकीर खान (Zakir Khan). मात्र याच झाकीर खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण झाकीर खान आता पुढील पाच वर्ष त्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. त्याने ५ वर्षांचा मोठा ब्रेक (5-year break) घेतला आहे. सध्या झाकीर खान हा देश-विदेशामध्ये त्याचे स्टॅन्डअप कॉमेडीचे शो करत आहे. त्याचा नुकताच एक शो हैदराबादमध्ये पार पडला. यावेळी त्याने ही मोठी बातमी त्याच्या चाहत्यांशी शेअर केली आहे. यावेळी त्याने आपल्या या ब्रेक घेण्यामागील कारण देखील सांगितले आहे. 

नक्की वाचा: मोठी बातमी!आकाशाला गवसणी घालणाऱ्या सुनीता विल्यम्स NASA मधून निवृत्त 

नेमकं काय म्हणाला झाकीर खान? (Zakir Khan)

मी एका मोठ्या ब्रेकवर जात आहे. हा ब्रेक कदाचित हा ब्रेक २०२८,२९ किंवा २०३० पर्यंत असू शकतो. मी हा ब्रेक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच माझ्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सोडवण्यासाठी हा ब्रेक घेणार आहे, असं म्हणत त्याने प्रेक्षकांना ही माहिती दिली. त्याच्या शो मधील ही भावनिक क्लिप व्हायरल होत आहे. 

अवश्य वाचा: अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमच अहिल्यानगर युवा संसदेचे आयोजन 

२० जून पर्यंत उरकणार सर्व शो! (Zakir Khan)

तसेच याबाबत त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी ठेवली आहे. ज्यामध्ये त्याने ब्रेकवर जाण्याअगोदर तो त्याचे कॉमेडी शो कशाप्रकारे उरकणार आहे. त्याबाबत माहिती दिली. त्यात तो म्हणाला आहे की, माझे पुढील सर्व कॉमेडी शो हे २० जून पर्यंत होणार आहेत. त्यामधील काही शहरांमध्ये मी येऊ शकत नाही. त्याचा तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. माझ्यावर प्रेम करण्यासाठी धन्यवाद,असं त्याने आपल्या स्टोरीमध्ये सांगितले आहे.