
District Sports Award : नगर : सन २०२४–२५ या वर्षासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कारांची (District Sports Award) घोषणा करण्यात आली असून गुणवंत खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व १० हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात येणार आहे.

अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील या प्रभागात नोटाला मतदारांची पसंती
क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी साईनाथ थोरात यांची निवड
बैठकीस क्रीडा विभागाचे उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी श्रीमती अंजली देवकर व जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी शैलेश गवळी आदी उपस्थित होते. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी साईनाथ दत्तात्रय थोरात (सायकलिंग) यांची निवड करण्यात आली आहे. सायकलिंग खेळात जिल्ह्यातील खेळाडूंना प्रशिक्षण देत त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले आहेत.
हे देखील वाचा: समाधान सरवणकरांचे भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड (District Sports Award)
गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी (पुरुष प्रवर्ग) वेदांत नितीन वाघमारे (रायफल शूटिंग) यांची निवड करण्यात आली असून त्यांनी ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिला प्रवर्गात साक्षी भास्कर भंडारी (मैदानी खेळ) यांनी राष्ट्रीय शालेय व वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त केल्यामुळे त्यांची निवड झाली आहे. दिव्यांग प्रवर्गात चैतन्य विश्वास कुलकर्णी (जलतरण) यांनी सलग चार वर्षे राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कार मिळविला आहे. थेट पुरस्कार अंतर्गत देवेंद्र श्रीहरी वैद्य (बुद्धिबळ) यांना डेफ चेस चॅम्पियनशिप व आशिया–पॅसिफिक डेफ गेम्समधील रौप्य पदकासाठी गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


