Breaking News: ब्रेकिंग!अहिल्यानगरमध्ये महापौर पद ‘या’ प्रवर्गासाठी राखीव

0
Breaking News:ब्रेकिंग!अहिल्यानगरमध्ये महापौर पद 'या' प्रवर्गासाठी राखीव
Breaking News:ब्रेकिंग!अहिल्यानगरमध्ये महापौर पद 'या' प्रवर्गासाठी राखीव

Breaking News: मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण २९ महापालिकांच्या (29 Coporation) महापौरपदासाठी (Mayoral post) आज (दि.२२) आरक्षण सोडतीच्या (Reservation draw) प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयात सोडत काढण्यात आली. यामध्ये अहिल्यानगर महापालिका (Ahilyanagar Municipal Corporation) ओबीसी (महिला) (OBC) प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे याठिकाणी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नक्की वाचा: मोठी बातमी!आकाशाला गवसणी घालणाऱ्या सुनीता विल्यम्स NASA मधून निवृत्त  

महापालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रियाला वेग (Breaking News)

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील २९  महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयात सोडत काढण्यात आली. यामध्ये अहिल्यानगरला महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहते याकडे नगरकरांचे लक्ष लागून राहिलेले होते. अखेर यावरचा पडदा आज उघडलेला आहे. महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाले असून महापालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रियाला वेग आला आहे. सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे.

अवश्य वाचा: अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमच अहिल्यानगर युवा संसदेचे आयोजन 

अहिल्यानगर मध्ये महापौरपदी कोणाची वर्णी लागणार ? (Breaking News)

अहिल्यानगर महापालिकेत ६८ नगरसेवक असून या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या तर भाजपाला २५ जागा मिळाल्या आहे. भाजप राष्ट्रवादी युतीने ५२ जागांवर विजयी संपादन केला आहे .त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर विराजमान होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र महापौरपदी कोण विराजमान होणार, शपथविधी कधी असणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागून लागली आहे. तसेच अनेक इच्छुकांची नावे देखील समोर आली आहे मात्र कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here