
Case registered : नगर : भिंगार येथील वडारवाडी भागात भांडण सोडविल्याचा राग मनात धरून एका बांधकाम ठेकेदारावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुरज दत्तात्रय तागडकर (वय ३०, रा. तागडकर वस्ती, वडारवाडी, भिंगार) असे जखमी ठेकेदाराचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल (Case registered) करण्यात आला आहे. अनिल दत्तु डोकडे, महादेव उत्तम डोकडे, मच्छिंद्र माया म्हस्के, सागर उत्तम डुकरे, धनराज शिवाजी डोकडे, अविनाश शिवाजी म्हस्के, पप्पू ऊर्फ बबलु नाथा डोकडे आणि नितीन प्रकाश डोकडे (सर्व रा. डोकडे वस्ती, वडारवाडी, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची (Suspected accused) नावे आहेत.
अवश्य वाचा: ई-पीक पाहणीसाठी प्रशासन ‘मिशन मोड’वर!; अधिकाऱ्यांची थेट बांधावर धाव
अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
फिर्यादी सुरज तागडकर हे तागडकर वस्ती येथे राहतात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका भांडणात त्यांनी मध्यस्थी करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून संशयित आरोपीने बेकायदा जमाव जमवला. संशयित आरोपींनी फिर्यादीच्या वस्तीवर जाऊन त्यांना गाठले आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हा वाद इतक्यावरच थांबला नाही, तर संशयित आरोपींनी लाथाबुक्क्यांसह लाकडी दांडक्याने सुरज तागडकर यांना मारहाण केली.
नक्की वाचा: लाडक्या बहिणींची केवायसी करुनही हप्ता जमा नाही,कारण नेमकं काय?
वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Case registered)
या हल्ल्यात तागडकर जखमी झाले असून, संशयित आरोपींनी त्यांच्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. घटनेनंतर जखमीला तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पोलीस अंमलदार शाहीद शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


