APAR ID: विद्यार्थ्यांनो’अपार आयडी’काढले का ?,३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत

0
APAR ID: विद्यार्थ्यांनो'अपार आयडी'काढले का ?,३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत
APAR ID: विद्यार्थ्यांनो'अपार आयडी'काढले का ?,३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत

नगर : केंद्र शासनाने विद्यार्थ्यांचे ‘अपार’ ओळखपत्र (APAR ID) तयार करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत (January 31)अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नाव व शैक्षणिक नोंदीतील नाव एकसमान करून ओळखपत्र निर्मिती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता हे अपार आयडी नेमकं काय आहे आणि ते का गरजेच आहे तेच जाणून घेऊयात…

नक्की वाचा: ब्रेकिंग!अहिल्यानगरमध्ये महापौर पद ‘या’ प्रवर्गासाठी राखीव

अपार आयडी म्हणजे काय ? (APAR ID)

‘ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’ याचे लघुरूप म्हणजे ‘अपार’. अपार आयडी कार्ड हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने सुरू केलेला एक उपक्रम आहे. या धोरणानुसार, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी देण्यात येणारा एकात्मिक शैक्षणिक ओळख क्रमांक म्हणजे अपार आयडी होय. तो नसल्यास डिजिटल शैक्षणिक नोंदींमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत,असं आवाहनही करण्यात येत आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड, त्यांच्या अचिव्हमेंट्स आणि क्रेडेन्शियल्स डिजिटल पद्धतीने संग्रहित करणारा १२ अंकांचा एक खास आयडी देते, यामुळे विद्यार्थ्यांचं इंटिग्रेटेड आयडेंटिफिकेशन सिस्टिम तयार होणार आहे.

अवश्य वाचा: अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमच अहिल्यानगर युवा संसदेचे आयोजन 

अपार आयडी कसे बनवावे? (APAR ID)

अपार आयडी तयार करण्यासाठी पालकांची परवानगी घेणे आवश्यक आहे.त्यासाठी तुम्हाला डिजीलॉकरवर साइन अप करावे लागेल. डिजीलॉकरची वेबसाइट किंवा अॅप उघडा. अपार आयडीसाठी ‘साइन अप’ करा. मोबाईल नंबर आणि आधार कार्डची माहिती भरा. ई-केवायसी पूर्ण करा.अश्या पद्धतीने तुमचा आयडी तयार होईल.

अपार आयडीसाठी कोण अर्ज करू शकतो? (APAR ID)

अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांची किमान वयोमर्यादा ५ वर्षे असावी लागते. यापेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्यांची अपार आयडी तयार केली जाणार नाही. अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्याला कोणत्यातरी मान्यताप्राप्त शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा लागतो.शासनाकडून अपार आयडीसाठी सक्ती केलेली नाही. मात्र सीईटी, नीट, जेईई अशा प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी अपार आयडी लागत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत ९३.११ टक्के अपार कार्ड तयार झालेले आहेत. विद्यार्थ्यांचे ‘अपार’ ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावी, अशा एकूण ५ हजार २६२ शाळांमध्ये ८ लाख ३८ हजार ८५८ विद्यार्थी आहेत. त्यातील ७ लाख ७७ हजार ७५२ विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले असून, ३ हजार २७६ जणांची नोंदणीसाठी रिक्वेस्ट पडलेली आहे. असे एकूण ७ लाख ८१ हजार २८ जण अपारच्या प्रक्रियेत आहेत. तर ५७ हजार ८३० विद्यार्थ्यांचे अपार अजूनही काढलेले नाही.