MLA Kashinath Date : पारनेर : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रिकरणामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू असतानाच, पारनेर तालुक्यात मात्र आगामी जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समिती निवडणुका (Panchayat Samiti Election) महायुतीच्याच झेंड्याखाली लढवल्या जातील, असा ठाम आणि स्पष्ट दावा आमदार काशीनाथ दाते (MLA Kashinath Date) यांनी केला आहे. पळवे येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका जाहीर केली.
अवश्य वाचा: कॉलेजच्या पार्किंगमध्ये विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल
पारनेरमध्ये महायुती अभेद्य
“राज्यात कितीही राजकीय घडामोडी घडल्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी पारनेरमध्ये महायुती अभेद्य आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून ऐतिहासिक आणि अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” असे दाते यांनी ठाम शब्दांत सांगितले.
नक्की वाचा: आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली नाही…आरक्षण सोडतीवर उद्धव ठाकरे गटाचा आक्षेप
दातेंच्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण (MLA Kashinath Date)
आगामी झेडपी व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम ठेवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर समन्वय साधला जाईल, असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे उपस्थित होते. आमदार दातेंच्या या धारधार भूमिकेमुळे राज्य पातळीवर राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले असून, महायुतीची भूमिका अधिक आक्रमक झाल्याचे संकेत मिळत आहेत.



