India Vs New Zealand | भारताचा न्यूझीलंडवर ४८ धावांनी दणदणीत विजय

India Vs New Zealand | भारताचा न्यूझीलंडवर ४८ धावांनी दणदणीत विजय

0
India Vs New Zealand | भारताचा न्यूझीलंडवर ४८ धावांनी दणदणीत विजय
India Vs New Zealand | भारताचा न्यूझीलंडवर ४८ धावांनी दणदणीत विजय

India Vs New Zealand | नगर : भारत व न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यात काल (ता. २१) नागपूर (Nagpur) येथे झालेल्या टी-२० क्रिकेट (Cricket) सामन्यात भारताने ४८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. अभिषेक शर्माच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताने २० षटकांत सात गडी गमावत २३८ धावा जमविल्या होत्या. न्यूझीलंडला मात्र, २० षटकांत सात गडी गमावत १९० धावाच जमवता आल्या.

अवश्य वाचा: कॉलेजच्या पार्किंगमध्ये विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल

भारताची प्रथम फलंदाजी (India Vs New Zealand)

टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. भारताने प्रथम फलंदाजी करत २३८ धावा जमवल्या. भारताची सुरुवात खराब झाली. संजीव सॅमसन (१० धावा) व इशांत किशन (८ धावा) हे दोघे झटपट बाद झाले. मात्र, सलामीवीर अभिषेक शर्माने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या मदतीने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी सुरू केली. या जोडीने ९९ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार २२ चेंडूंत ३२ धावा काढत बाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात आला. त्याची व अभिषेकची जोडी जमण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अभिषेक शर्मा ३५ चेंडूंत ८ षटकार व पाच चौकाराच्या सहाय्याने ८४ धावा जमवत बाद झाला. त्यानंतर आलेला शुभम दुबेही (९ धावा) झटपट बाद झाला. रिंकू सिंगने मैदानात येताच चौकार व षटकारांची आतषबाजी सुरू केली. त्याने २० चेंडूंत नाबाद ४४ धावांची तडाखेबाज खेळी साकारली. न्यूझीलंडकडून जॅकब डफी व काईल जेमीसनने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

नक्की वाचा: आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली नाही…आरक्षण सोडतीवर उद्धव ठाकरे गटाचा आक्षेप

न्यूझीलंडचे फलंदाज मैदानात टिकले नाही (India Vs New Zealand)

२३९ धावांचे भलेमोठे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या केवी फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी जास्त वेळ मैदानात टिकू दिले नाही. ग्लेन फिलिप्सने ४० चेंडूत ७८ धावांची खेळी केली मात्र, त्याला संघासाठी विजय खेचून आणता आला नाही. न्यूझीलंडचा संघ २० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १९० धावाच जमवू शकला. भारताकडून शुभम दुबे व वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.