Vishal Ganpati | नगर : श्री गणेश जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश (Vishal Ganpati) मंदिर येथे श्री गणेश जन्मावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज (ता. २२) सकाळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) व परिवार यांच्या हस्ते सहस्रावर्तन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले तसेच श्री गणेश जन्माच्या वेळेस आमदार संग्राम जगताप व शीतल जगताप यांच्या हस्ते महापूजा करून आरती करण्यात आली.
नक्की वाचा: बापरे!सोनं ४ हजार रुपयांनी स्वस्त,तर चांदीची २० हजार रुपयांनी घसरण

गणेश याग (Vishal Ganpati)
यावेळी उद्योजक गणेश श्रीनिवास झंवर परिवार आणि श्री गणेश यागचे यजमान महेंद्र पडोळे व नगरसेविका सुजाता पडोळे आदींसह पडोळे परिवार उपस्थित होता. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, विजय कोथिंबिरे, बापूसाहेब एकाडे, रंगनाथ फुलसौंदर, ज्ञानेश्वर रासकर, हरिश्चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, संजय चाफे, प्रा.माणिक विधाते, नितीन पुंड आदींसह पुजारी संगमनाथ महाराज यागाचे पौराहित्य नाशिक येथील मुकुंदशास्त्री मुळे यांनी केले.

या प्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले की श्री गणेश जयंती निमित्त गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या तसेच लवकरच मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले जाईल तसेच काही दिवसांपूर्वीच हा परिसर कॉक्रीटीकरण करण्यात आल्याने परिसर भव्य दिव्य दिसत आहे. सर्वांच्या सहकार्याने ही विकासकामे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले तसेच श्री गणेशाच्या आशीर्वादाने काम करण्यास प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा: विद्यार्थ्यांनो ‘अपार आयडी’ काढले का ?,३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा (Vishal Ganpati)
प्रारंभी सकाळी अभिषेक करण्यात आला. भाविकांनी पहाटे पासून रांगा लावल्या होत्या. दुपारी गणेश जन्मवेळी यावेळी भाविकांनी पुष्पसृष्टी केली. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेश जयंतीनिमित्त मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांसाठी मंडप, बॅरिगेटस्, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मंदिरातील सेवेकरी व पोलीस प्रशासन भाविकांच्या गर्दीेचे नियोजन करत होते.



