Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत २४ जानेवारीला भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत २४ जानेवारीला भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत २४ जानेवारीला भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम
Nilesh Lanke : खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत २४ जानेवारीला भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

Nilesh Lanke : नगर : संत तुकाराम महाराजांच्या पावन चरणांनी स्पर्श झालेल्या देहू (Dehu) नगरीत अस्वच्छता आणि पर्यावरण ऱ्हासाविरोधात थेट मैदानात उतरायची तयारी ‘आपला मावळा’ (Aapla Mavla) संघटनेने केली आहे. खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने २४ जानेवारी रोजी देहूत स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. पवित्र देहूच्या सन्मानासाठी ही मोहीम म्हणजे एक सामाजिक लढाच ठरणार आहे.

या मोहिमेत देहू शहरातील प्रमुख रस्ते, घाट परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच नदीकाठाची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. केवळ कचरा उचलण्यापुरते मर्यादित न राहता, देहू परिसर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक कसा राहील, यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी वृक्षारोपण करून हिरव्या देहूचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यात येणार आहे.

अवश्य वाचा: कॉलेजच्या पार्किंगमध्ये विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल

स्वच्छतेसाठी श्रमदानातून एकजूट दाखविणार

या स्वच्छता मोहिमेत आपला मावळा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते, स्वयंसेवक, स्थानिक नागरिक तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. देहूच्या पावन भूमीसाठी ‘मावळे’ एकदिलाने मैदानात उतरणार असून, स्वच्छतेसाठी श्रमदानातून एकजूट दाखविणार आहेत. खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार असून, यावेळी स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण रक्षण आणि नागरिकांची जबाबदारी यावर भर देत जनजागृती करण्यात येणार आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा संदेश या मोहिमेतून दिला जाणार आहे.

नक्की वाचा: आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली नाही…आरक्षण सोडतीवर उद्धव ठाकरे गटाचा आक्षेप

स्वच्छ देहू – हरित देहू संकल्पना (Nilesh Lanke)

“स्वच्छ देहू – हरित देहू” या ठाम संकल्पनेतून ही मोहीम राबवली जात असून, समाजातील प्रत्येक घटकाने स्वच्छता आणि वृक्षसंवर्धनासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. पवित्र देहूच्या गौरवाला साजेसा स्वच्छ व हिरवा परिसर निर्माण करण्यासाठी ही मोहीम मैलाचा दगड ठरणार आहे.

आपला मावळा संघटना आणि नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणारी ही मोहीम सामाजिक भान, पर्यावरणाची जबाबदारी आणि सामूहिक सहभागाचे ठोस उदाहरण ठरणार असून, देहूच्या पावन भूमीवर स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.