Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत ‘या’ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत 'या' उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

0
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत 'या' उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत 'या' उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

Ahilyanagar Municipal Corporation Election : नगर : अहिल्यानगर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक (Ahilyanagar Municipal Corporation Election) नुकतीच झाली. या निवडणुकीत भाजप (BJP)राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP (Ajit Pawar)) गटाच्या युतीचे ५२ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत जसे युतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्याचप्रमाणे अनेक विरोधी उमेदवारांच्या अनामत रकमाही जप्त झाल्या.

नक्की वाचा: भाच्यानेच केला मामाचा खून; स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ दिवसानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल

शरद पवार गट उमेदवारांच्या सर्वाधिक अनामत रकमा जप्त

उमेदवारी अर्ज दाखल करतानाच निवडणूक आयोग उमेदवारांकडून अनामत रक्कम घेत असतो. निवडणुकीत विजयी उमेदवारांपेक्षा १६.३३ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाल्यास त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत १४९ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत. पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्वाधिक उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत.

अवश्य वाचा: फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…

ईतर उमेदवाराच्यांही अनामत रकमा जप्त (Ahilyanagar Municipal Corporation Election)

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा १, शिवसेना शिंदे गटाचे ७, एआयएमआयएमचे २, काँग्रेसचे ४, बसपचे १, शिवसेना उद्धव ठाकरे गटचे १८, शिवराष्ट्र सेनाचे १, वंचित बहुजन आघाडीचे २, एकलव्य बहुजन आघाडीचे ३, समाजवादी पक्षाचे ५, आम आदमी पक्षाचे ६, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ८, राष्ट्रवादी  काँग्रेस शरद पवार गटाचे १८ तर अपक्ष ७३ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे अपक्ष पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्वाधिक उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत. या पक्षाचे एकही उमेदवार विजयी झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अहिल्यानगर शहरातील भवितव्य काय हे आगामी काळच ठरवेल.