Panipat : श्रीगोंदा : श्रीगोंदा ही पानिपत (Panipat) वीरांची भूमी आहे. इथे पानिपत आणि शिंदेशाही घराण्याचा मोठा इतिहास (History) व वारसा लाभलेला आहे. पानिपत युध्दात देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या तरुणांचा सहवास लाभलेला आहे. श्रीगोंदा शहरात (Shrigonda City) व ग्रामीण भागात पानिपत वीरांच्या पाऊलखुणा असणारे राजवाडे, वेस, समाधीस्थळे, बारवा, मंदिरे अक्षम्य दुर्लक्षामुळे अत्यंत विदारक अवस्थेत असुन हा वारसा मोडकळीस आलेला आहे.
नक्की वाचा: भाच्यानेच केला मामाचा खून; स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ दिवसानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल
शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीकडून अथक प्रयत्न
वेळीच हा वारसा संवर्धन केला नाही तर नामशेष होऊ शकतो. पुढील पिढीसाठी पानिपत वीरांचा वारसा व शिंदेशाही इतिहास संवर्धन करण्यासाठी, जनजागृती मोहीम शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने इतिहास प्रेमी नागरिकांची सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यास २००० नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या सह्या नोंदवल्या आहेत. दोन महिन्यांपासुन शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने हा वारसा जतन करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
अवश्य वाचा: फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…
पानीपत वीरांचा वारसा संवर्धनासाठी सह्यांची मोहिम (Panipat)
श्रीगोंदा शहरात असणारा पानिपत वीरांचा वारसा दररोज ढासळत आहे. हा वारसा पुढील पिढीसाठी टिकला पाहिजे या उदात्त हेतूने शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन संस्थेच्या सदस्यांनी दोन महिन्यापासन ही मोहिम हाती घेतली आहे. पानीपत वीरांचा वारसा संवर्धनासाठी सह्यांची मोहिम सुरू आहे, आणि सुरूच राहील. ऑक्टोबर २०२५ मध्ये पहिले निवेदन दिले होते. त्यास पाठींबा म्हणून पुणे -अहिल्यानगर जिल्हयातील नागरिकांच्या सह्यांचे दुसरे निवेदन श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे यांचे माध्यमातुन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार मिलिंद जाधव, शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे, कायदेशीर सल्लागार ॲड. गोरख कडूस पाटील, मोहिम प्रमुख दिगंबर भुजबळ, नितीन शेळके उपस्थित होते.



