
Sangram Jagtap : नगर : शहरातील जैन समजाने आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना वेळोवेळी साथ दिली असून त्यांनीही जैन समाजाचे प्रश्न सोडवत समाजाला साथ दिली आहे. महापालिकेच्या निवडणूकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) आमदार संग्राम जगताप यांचे कर्तृत्व व माजी खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांचे नेतृत्व एक आल्यानेच युतीला एवढे मोठे सुयश मिळाले आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा यांनी केले.
नक्की वाचा: भाच्यानेच केला मामाचा खून; स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ दिवसानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल
नूतन नगरसेवकांचा सत्कार
बडीसाजन ओसवाल श्री संघाच्या वतीने प्रभाग १३ व १४ मधून विजयी झालेल्या आठी नूतन नगरसेवकांचा तसेच भिंगार छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी वसंत राठोड यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल व राजेंद्र बोथरा यांची जॉग्री असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करणात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पेमराज बोथरा, उपाध्यक्ष अजित कर्नावट, सचिव विशाल शेटिया, सहसचिव अनिल लुंकड, खजिनदार मिलिंद जांगडा, सहखजिनदार दीपक बोथरा आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.
अवश्य वाचा: फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…
अनेक मान्यवरांची उपस्तिथी (Sangram Jagtap)
या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, अविनाश घुले, सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटिया, माजी महापौर भगवान फुलसुंदर व मनीष चोपडा आदी उपस्थित होते. बडीसाजन संघाचे सचिव विशाल शेटिया यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ संचालक सुमतिलाल कोठारी यांनी आभार मानले. यावेळी संचालक सुशील भंडारी, धन्यकुमार बरमेचा, मनोज शेटिया, पोपटलाल कटारिया, नरेंद्र चोरडिया, नरेंद्र बाफना, अनिल दुग्गड, माजी नगरसेवक विपुल शेटिया, राजू शेटिया व संजय ताथेड आदी उपस्थित होते.


