MNREGA : कर्जतमध्ये मनरेगा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावत आंदोलन

MNREGA : कर्जतमध्ये मनरेगा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावत आंदोलन

0
MNREGA : कर्जतमध्ये मनरेगा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावत आंदोलन
MNREGA : कर्जतमध्ये मनरेगा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावत आंदोलन

MNREGA : कर्जत: कर्जतमध्ये मनरेगा (MNREGA) अंतर्गत कार्यरत असणारे कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यानी (Contract Officers and Employees) आंदोलनाचे हत्यार उपसले असून शुक्रवारपासून (ता.२३) काळ्या फिती लावत राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय कामे प्रामाणिकपणे पार पाडत असून सेवेचे नियमितीकरण, सेवा-सुरक्षा व समान वेतन यासारख्या मूलभूत मागण्यांकडे शासन (Government) सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. याबाबत वरीष्ठ स्तरावर वारंवार पाठपुरावा करून देखील त्याची दखल न घेतल्याने आंदोलन पुकारले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

नक्की वाचा: भाच्यानेच केला मामाचा खून; स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ दिवसानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल

समान काम समान वेतन धोरण लागू करण्याची मागणी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना इतर योजनेतील कर्मचाऱ्याप्रमाणे शासन सेवेत नियमित समायोजन करावे. तसेच मनरेगा अंतर्गत एस टू इन्फोटेक कंपनीद्वारे होणारी अनधिकृत- अवैध भरती प्रक्रीया तात्काळ थांबवावी यासह सदरची कंपनी बाजूला करीत त्या ऐवजी सर्व कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशन मार्फत नियुक्ती देत समान काम समान वेतन धोरण लागू करावे.

अवश्य वाचा: फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…

राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय (MNREGA)

त्याच प्रमाणे इतर विभागाप्रमाणे मनरेगा विभागाची स्वतंत्र यंत्रणा उभारत पदनिहाय आकृतीबंध तयार करावे या न्यायिक मागण्यांसाठी सर्व कर्मचारी अनेक वर्षांपासून शासन स्तरावर पाठपुरावा करून लढा देत आहे. मात्र शासन या रास्त मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आपली भूमिका जाहीर करीत नसल्याने शुक्रवार, दि २३ जानेवारीपासून काळ्या फिती लावत राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय कर्जतच्या मनरेगा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. वरील आशयाचे निवेदन पंचायत समिती आणि महसुल प्रशासनास दिले आहे. या प्रसंगी सिद्धार्थ धावडे, अरबाज शेख, सागर खांबट, मनोज आष्टेकर, तुषार खरात, अश्विन गवळी, रंगनाथ जरांडे, संपदा वाबळे, सतीश देवकर, सोनाली व्यवहारे, दौलत पवार आणि दत्ता पवार उपस्थित होते.