
Nationalist Congress Party (Sharad Pawar) : नगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (Nationalist Congress Party (Sharad Pawar)) सर्व उमेदवार पराभूत झाले. या मागील राजकीय घडामोडींवर वरिष्ठ पत्रकार विजयसिंह होलम (Vijaysingh Holam) यांची राजकीय विश्लेषण (Political Analysis) करणारी मुलाखत आय लव्ह नगर टीमने घेतली. यात त्यांनी २०१९पासून आजपर्यंतच्या अनेक घटनाक्रमांच्या आधारे शरद पवार गटाच्या पराभवाची कारणे सांगितली.
नक्की वाचा: भाच्यानेच केला मामाचा खून; स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ दिवसानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल
विखे-पवार वैर
विजयसिंह होलम म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील पराभव विखे पाटलांना जिव्हारी लागला. घराणेशाहीच्या राजकारणाला हे फार जिव्हारी लागले. याचे कनेक्शन थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी आहे. विखे-पवार वैर त्यावेळी व आताही कायम आहे. २०१९मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने डॉ. सुजय विखे पाटलांना खासदारकीचे तिकीट दिले असते तर विखे पाटील भाजपमध्ये गेले नसते, असा राजकीय क्रम सांगतो. विखे पाटलांना मोठे होऊ द्यायचे नाही. त्यांच्या मुलाला राजकारणात येऊ द्यायचे नाही, आपल्या डोईजड होऊ द्यायचे नाही. हे वैयक्तिक राजकारणातून घडले होते. त्यामुळे अखेरच्या टप्प्यापर्यंत सुजय विखेंना अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली नाही. त्याच वैयक्तिक राजकारणाची दुसरी आवृत्ती मागील लोकसभा निवडणुकीत पहायला मिळाली. त्यावेळी विखे भाजपचे खासदार होते. त्यांचा पराभव करण्यासाठी निलेश लंकेंसारख्या सामान्य माणसाला शरद पवारांनी मोठे केले. त्याला संपूर्ण पाठबळ पुरविले. त्यांचा प्रचार केला. यातून निलेश लंके यांचा विजय झाला, असे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा: फडणवीस यांनी झापलं…तरी MIM शी भाजपचं सूत जुळलं…
ते पुढे म्हणाले, (Nationalist Congress Party (Sharad Pawar))
शरद पवार गटासह महाविकास आघाडीची सर्व मदार होती ती खासदार निलेश लंके यांच्यावर. मात्र, लंके लोकसभा निवडणुकीत जी जादू मतदारांवर करू शकले ती जादू ते विधानसभा व महापालिका निवडणुकीत करू शकले नाहीत. ज्या प्रोपोगंडा अथवा वातावरण निर्मितीच्या आधारे ते निवडून आले होते त्या प्रोपोगंडाचा फुगा फोडण्याचे काम माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपच्या लोकांनी केले. मतदारांनी लोकसभेच्या वेळी चुकीचा निर्णय घेतल्याचे बिंबविण्यात युतीला यश आले. त्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीकडे पाठ फिरवली. खासदार तुम्हाला भेटले का, तुमचे प्रश्न सोडविले का अशी विचारणा भाजपचे कार्यकर्ते मतदारांना करू लागले. त्यामुळे मतपरिवर्तन झाले असावे. विखे पाटलांकडून निलेश लंकेंवर टीका सुरू झाली आहे. हे त्याच पराभवाचे शल्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


