Voice Arts Awards : मनीष डोंगरदिवेला ‘व्हॉइस आर्ट्स अवॉर्ड’ प्रदान

Voice Arts Awards : अहिल्यानगरच्या मनीष डोंगरदिवेला ‘व्हॉइस आर्ट्स अवॉर्ड’ प्रदान

0
Voice Arts Awards : अहिल्यानगरच्या मनीष डोंगरदिवेला ‘व्हॉइस आर्ट्स अवॉर्ड’ प्रदान
Voice Arts Awards : अहिल्यानगरच्या मनीष डोंगरदिवेला ‘व्हॉइस आर्ट्स अवॉर्ड’ प्रदान

Voice Arts Awards : नगर: उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) संचालित वनव्हॉइस ट्रान्समीडियाने (OneVoice Transmedia) बनवलेला आणि नितीश कटारिया चित्रित ‘अभय प्रभावना’ या माहितीपटाचा अमेरिकेत सन्मान करण्यात आला आहे. या माहितीपटासाठी अहिल्यानगरच्या मनीष डोंगरदिवेला (Manish Dongardive) ‘व्हॉइस ॲक्टिंगचा ऑस्कर’ मानला जाणारा ‘व्हॉइस आर्ट्स अवॉर्ड’ (Voice Arts Awards) लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे प्रदान करण्यात आला.

नक्की वाचा: अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पानिपत का झाले?

हा अवॉर्ड जिंकणारे डोंगरदिवे पहिले मूळ भारतीय

मनीष डोंगरदिवे हे व्हॉइस आर्ट्स अवॉर्ड जिंकणारे पहिले मूळ भारतीय व्हॉइस आर्टिस्ट ठरल्याने जागतिक व्हॉइस-ओव्हर उद्योगाने एक नवीन टप्पा गाठला. बेव्हरली हिल्टनच्या प्रसिद्ध इंटरनॅशनल बॉलरूममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटी ऑफ व्हॉइस आर्ट्स अँड सायन्सेसद्वारे प्रदान केलेले हे पुरस्कार, कलेसाठी सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मानाचे प्रतिनिधित्व करतात.

Voice Arts Awards : अहिल्यानगरच्या मनीष डोंगरदिवेला ‘व्हॉइस आर्ट्स अवॉर्ड’ प्रदान
Voice Arts Awards : अहिल्यानगरच्या मनीष डोंगरदिवेला ‘व्हॉइस आर्ट्स अवॉर्ड’ प्रदान

अवश्य वाचा: परवानगीशिवाय विजयी मिरवणूक; एमआयएमच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल

भारतीय उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ‘पहिले’ पाऊल (Voice Arts Awards)

जरी यापूर्वी भारतीय वंशाच्या प्रतिभेचा गौरव करण्यात आला असला तरी, डोंगरदिवे यांचा विजय भारतीय उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण ‘पहिले’ पाऊल आहे. या सोहळ्यासाठी “चित्रपट इतिहासातील महान दिग्गजांनी या रंगमंचावर हजेरी लावली होती. या रंगमंचावर उभे राहणे हा एक अविश्वसनीय सन्मान आहे, असे मनीष डोंगरदिवे यावेळी  म्हणाले.

हे देखील वाचा: राग आला तर आला, निवडणुका चार वर्षांनी… गुलाबरावांचं वादग्रस्त वक्तव्य