Jyoti Gadkari : महिलांनी न घाबरता पोलीस स्टेशनला यावे : गडकरी

Jyoti Gadkari : महिलांनी न घाबरता पोलीस स्टेशनला यावे : गडकरी

0
Jyoti Gadkari : महिलांनी न घाबरता पोलीस स्टेशनला यावे : गडकरी
Jyoti Gadkari : महिलांनी न घाबरता पोलीस स्टेशनला यावे : गडकरी

Jyoti Gadkari : पारनेर : पोलीस स्टेशन म्हणजे केवळ गुन्हेगारांसाठीची जागा किंवा भीतीचे ठिकाण, असा समज अनेक महिलांच्या मनात असतो. मात्र, प्रत्यक्षात पोलीस (Police) हे तुमचे मित्र आहेत. पोलीस स्टेशनचे कामकाज नेमके कसे चालते आणि महिला सुरक्षेसाठी (Women’s Safety) शासनाने कोणत्या विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी महिलांनी मनातली भीती काढून न घाबरता पोलीस स्टेशनला यावे,” असे सकारात्मक आवाहन सुपा पोलीस स्टेशनच्या (Supa Police Station) पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी (Jyoti Gadkari) यांनी केले.

जातेगाव येथे श्री काळभैरवनाथ माजी सैनिक महिला बचत गटाच्या वतीने आयोजित ‘हळदी-कुंकू’ समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नक्की वाचा: अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पानिपत का झाले?

महिलांनी ग्रामसभेला उपस्थित राहून योजनांची माहिती घ्यावी

नवीन वर्षाचे स्वागत आणि स्नेहवृद्धीसाठी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक महिलेला बचत गटाच्या वतीने सप्रेम भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांनी केवळ चूल आणि मूल यात मर्यादित न राहता सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. यावेळी ग्रामसेवक राजू विधाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “राज्य आणि केंद्र सरकारमार्फत महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, माहितीअभावी अनेक महिला या लाभांपासून वंचित राहतात. महिलांनी गावातील ग्रामसभेला नियमित उपस्थित राहून आपल्या हक्कांच्या योजनांची माहिती घ्यावी आणि त्यांचा लाभ घ्यावा.” कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्यासपीठावर बचत गटाच्या अध्यक्षा सुरेखा गणेश वाखारे, उपाध्यक्ष मृणाली कारभारी पोटघन आणि सचिव मंगल लहू ढोरमले यांची प्रमुख उपस्थिती होती.

अवश्य वाचा: 10 किलो ड्रग्ज पारनेरमध्ये कुणाच्या घरात होते..? डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

महिला मोठ्या संख्येने उपस्थित (Jyoti Gadkari)

तसेच निर्मला बाजीराव पोटघन, रत्नमाला शिवाजी ढोरमले, निर्मला मारुती पोटघन, सुमन लक्ष्मण पोटघन, लता भानुदास पोटघन, आशा पंढरीनाथ ढोरमले, मेघा ढोरमले, चैताली फटांगडे, सोनाली औटी, सुनीता ढोरमले, आरती ढोरमले, पूजा ढोरमले, प्राजक्ता ढोरमले, सीमा पोटघन, सुनीता वाखारे, सुषमा जहाड, कमल ढोरमले, अनिता फटांगडे, अश्विनी ढोरमले, चंद्रकला ढोरमले, कांताबाई जहाड, सविता नितीन ढोरमले यांसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हे देखील वाचा: राग आला तर आला, निवडणुका चार वर्षांनी… गुलाबरावांचं वादग्रस्त वक्तव्य

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुखदेव गेणबा पोटघन, मारुती पोटघन, गणेश वाखारे, कारभारी पोटघन आणि अनिल ढोरमले यांनी विशेष परिश्रम घेतले. अत्यंत आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा वाखारे व मृणाल पोटघन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुमनबाई पोटघन व लता पोटघन यांनी मानले.