Political Controversy : नेत्यांची भूमिका दुटप्पी; राजकीय वादाला फुटले तोंड, सोशल मीडियावर तीव्र संताप

Political Controversy : नेत्यांची भूमिका दुटप्पी; राजकीय वादाला फुटले तोंड, सोशल मीडियावर तीव्र संताप

0
Political Controversy : नेत्यांची भूमिका दुटप्पी; राजकीय वादाला फुटले तोंड, सोशल मीडियावर तीव्र संताप
Political Controversy : नेत्यांची भूमिका दुटप्पी; राजकीय वादाला फुटले तोंड, सोशल मीडियावर तीव्र संताप

Political Controversy : नगर : निवडणूक प्रचाराच्या (Election Campaigning) काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत, स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी (Hindutva) म्हणून या दोन्ही नेत्यांनी हिंदुत्ववादी मतदारांकडे मते मागितली होती. मात्र, निवडणूक संपल्यानंतर बुरुडगाव येथील तय्यब मज्जिदीत आयोजित सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्कार स्वीकारल्याने त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अहिल्यानगर महापालिका प्रभाग क्रमांक १४ मधील दोन स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे शहरात राजकीय वादाला (Political Controversy) तोंड फुटले असून, सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पानिपत का झाले?

मतदारांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त

हिंदुत्वाचा प्रचार करणारे हेच नेते निवडणुकीनंतर थेट अल्पसंख्यांक समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने ‘हे कोणते हिंदुत्व?’ असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. या घटनेनंतर नगर शहरात आणि सोशल मीडियावर टीकेची झोड उठली असून, नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू आहे. राजकीय सोयीसाठी भूमिका बदलली जात असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे, तर काहींनी थेट मतदारांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा: राग आला तर आला, निवडणुका चार वर्षांनी… गुलाबरावांचं वादग्रस्त वक्तव्य

सोशल मीडिया अकाऊंटवरून व्यक्त हाेताेय निषेध (Political Controversy)

या प्रकरणाचा निषेध करत ‘सकल हिंदू समाजा’च्या नावाने चालवण्यात येणाऱ्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून माजी महापौर भगवान फुलसौंदर आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. ‘एकीकडे हिंदुत्वाचा झेंडा हातात घ्यायचा आणि दुसरीकडे मशिदीत जाऊन सत्कार स्वीकारायचा हा ढोंगीपणा नाही तर काय?’ असा थेट आरोप या करण्यात आला आहे. संबंधित पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


या वादावर अद्याप संबंधित नेत्यांकडून कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आली नाही. त्यांच्या मौनामुळे संशय अधिक बळावत असून, राजकीय जबाबदारीपासून पळ काढला जातोय का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकरणावर संबंधित नेते काय भूमिका घेतात, हिंदुत्ववादी मतदारांच्या रोषावर ते कसे उत्तर देतात, याकडे आता संपूर्ण अहिल्यानगर शहराचे लक्ष लागले आहे.