PM Shri Kendriya Vidyalaya : अहिल्यानगरच्या पी एम श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ मध्ये ‘पराक्रम दिवसानिमित्त’ जिल्हास्तरीय ‘परीक्षा पे चर्चा’ स्पर्धेचे आयोजन

PM Shri Kendriya Vidyalaya : अहिल्यानगरच्या पी एम श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ मध्ये 'पराक्रम दिवसानिमित्त' जिल्हास्तरीय 'परीक्षा पे चर्चा' स्पर्धेचे आयोजन

0

PM Shri Kendriya Vidyalaya : नगर : अहिल्यानगरमधील पी एम श्री केंद्रीय विद्यालय (PM Shri Kendriya Vidyalaya) क्र. 1 येथे पराक्रम दिवसानिमित्त परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमाअंतर्गत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) वर आधारित स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्ह्यातील १० शाळांतील 105 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे उदघाटन शाळेच्या प्राचार्या श्रीमती पूजा यांनी केले.

अवश्य वाचा: 10 किलो ड्रग्ज पारनेरमध्ये कुणाच्या घरात होते..? डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

विद्यार्थी व शिक्षक उपस्थित

कार्यक्रमला शाळेचे हेडमास्तर श्री पाटील सर समवेत विविध शाळेतून आलेले विद्यार्थी व त्यांच्यासोबत आलेले शिक्षक सुद्धा उपस्थित होते. उपस्थितांना प्राचार्या श्रीमती पूजा यांनी पराक्रम दिवस आणि परीक्षा पे चर्चा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

हे देखील वाचा: राग आला तर आला, निवडणुका चार वर्षांनी… गुलाबरावांचं वादग्रस्त वक्तव्य

एन सी ई आर टी चे विशेष मॉड्युल ‘स्वदेशी’ च वितरण (PM Shri Kendriya Vidyalaya)

या उपक्रमात विद्यार्थ्यांचे 2 गट पाडण्यात आले. पहिला गट 6वी ते 8वी(ज्युनिअर) आणि दुसरा गट ९ वी ते 12 वी (सिनिअर). प्रत्येक गटात परीक्षेत प्रथम 3 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांना शिक्षा मंत्रालय अखत्यारीत एन सी ई आर टी ने तयार केलेली विशेष मॉड्युल ‘स्वदेशी’ च वितरण करण्यात आलं ज्यामध्ये आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत पर्यंतच्या प्रवासाचे महत्व रेखांकित केले आहे.

PM Shri Kendriya Vidyalaya : अहिल्यानगरच्या पी एम श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ मध्ये 'पराक्रम दिवसानिमित्त' जिल्हास्तरीय 'परीक्षा पे चर्चा' स्पर्धेचे आयोजन
PM Shri Kendriya Vidyalaya : अहिल्यानगरच्या पी एम श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ मध्ये ‘पराक्रम दिवसानिमित्त’ जिल्हास्तरीय ‘परीक्षा पे चर्चा’ स्पर्धेचे आयोजन

कार्यक्रमला शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि कार्यक्रम यशवीरित्या संपन्न झाला. हेडमास्तर श्री पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.