Deadly Attack : करजगावमध्ये जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला!

Deadly Attack : करजगावमध्ये जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला!

0
Deadly Attack : करजगावमध्ये जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला!
Deadly Attack : करजगावमध्ये जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला!

Deadly Attack : नगर : राहुरी तालुक्यातील करजगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. आदिवासी समाजातील एका महिला व अल्पवयीन मुलींवर प्राणघातक हल्ला (Deadly Attack) करून त्यांचा विनयभंग (Molestation) केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत अनेक महिला, लहान मुले व पुरुष गंभीर जखमी (Seriously Injured) झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अवश्य वाचा: 10 किलो ड्रग्ज पारनेरमध्ये कुणाच्या घरात होते..? डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण

करजगाव येथील जमिनीच्या वादातून जमावाने थेट आदिवासी कुटुंबावर प्राणघातक हल्ला चढवला या हल्लेखोरांनी फावडे, कोयते, लोखंडी सळई व लाकडी दांड्यांच्या सहाय्याने महिला, लहान मुले, अल्पवयीन मुली व कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. महिलांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, तर अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिलांचा विनयभंग करताना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली तसेच घरे पाडून टाका, घरे पेटवून द्या, असे एकमेकांना चिथावणीखोर आवाहन करण्यात आले असल्याचे महिलेने म्हटले आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पानिपत का झाले?

राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने तीव्र संतापाची लाट (Deadly Attack)

एवढा गंभीर गुन्हा घडूनही राहुरी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल न केल्याने संपूर्ण जिल्ह्यातील भिल्ल समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आदिवासी बचाव समितीच्या सदस्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन पीडितांची भेट घेतली व त्यांना दिलासा दिला. संबंधित आरोपींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आदिवासी बचाव समितीने दिला आहे. यावेळी शिवाजीराव गांगुर्डे, कैलास दादा माळी, सुभाष पवार, शिवाजी जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा: राग आला तर आला, निवडणुका चार वर्षांनी… गुलाबरावांचं वादग्रस्त वक्तव्य