Republic Day : दिल्लीत कर्तव्य पथावर घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर

Republic Day : दिल्लीत कर्तव्य पथावर घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर

0
Republic Day : दिल्लीत कर्तव्य पथावर घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर
Republic Day : दिल्लीत कर्तव्य पथावर घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर

Republic Day : नगर : दरवर्षी प्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) दिल्लीत कर्तव्य पथावर (Kartavya Path) भव्य संचलन पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी या परेडचे अध्यक्षस्थान भूषवले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रमुख उपस्थिती होती. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नक्की वाचा: मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट बँडची शहिदांना संगीतमय आदरांजली

भारताच्या सैन्य सज्जतेचे व शस्रांचे प्रदर्शन

यंदा भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजपथावर भारतीय सैन्य दल, हवाई दल आणि नौदलाच्या विविध रेजिमेंट्सने आपल्या विविध विभागांच्या तुकड्यांसह भव्य संचालन केले. या संचलनाने भारताच्या सैन्य सज्जतेचे व भारतीय शस्रांचे प्रदर्शन पाहायला मिळाले. या संचलनामध्ये खास करून मेक एन इंडिया असलेल्या विविध आयुध व शस्र हे विशेष आकर्षण ठरले.

अवश्य वाचा: हा सण ऊर्जा आणि प्रेरणा… पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा चित्ररथ (Republic Day)

या संचलनामध्ये भारताच्या विविध राज्यांचे चित्ररथांचंही संचलन पार पडले. यामधून ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेवर आधारित सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा चित्ररथही सहभागी झाला होता. कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा चित्ररथ गौरवाने मिरवला गेला. गणेशोत्सव ही यावेळची मुख्य थीम होती. त्यामुळे दिल्लीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर घुमला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल यांनी टाळ्या वाजवून कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या रथाचं कौतुक केलं.