Accident : अहिल्यानगर-दौंड महामार्गावर कार व दुचाकीचा भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी

Accident : अहिल्यानगर-दौंड महामार्गावर कार व दुचाकीचा भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी

0
Accident : अहिल्यानगर-दौंड महामार्गावर कार व दुचाकीचा भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी
Accident : अहिल्यानगर-दौंड महामार्गावर कार व दुचाकीचा भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी

Accident : श्रीगोंदा : अहिल्यानगर-दौंड महामार्गावरील (Ahilyanagar-Daund Highway) घारगाव परिसरात रविवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास टाटा नेक्सन कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात (Accident) घडला. या जोरदार धडकेत तीन जण गंभीर जखमी (Seriously injured) झाले असून, त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लखन साळवे (रा. बाबुर्डी बेंद, ता. अहिल्यानगर), राहुल शिवाजी गव्हाणे (वय २०) व शालन दिलीप कोळेकर (वय ५०, रा. बार्शी, जि. धाराशिव) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

नक्की वाचा: मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट बँडची शहिदांना संगीतमय आदरांजली

दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २५) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घारगाव शिवारात कार व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कार पलटी मारत रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पडली. तर दुचाकीचा चक्काचूर झाला. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल केले आहे.

Accident : अहिल्यानगर-दौंड महामार्गावर कार व दुचाकीचा भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी
Accident : अहिल्यानगर-दौंड महामार्गावर कार व दुचाकीचा भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी

अवश्य वाचा: हा सण ऊर्जा आणि प्रेरणा… पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

जखमींची प्रकृती चिंताजनक (Accident)

अपघाताची भीषणता पाहून रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. बेलवंडी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिकेतून अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.