Republic Day Parade 2026 : नगर : प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) ‘राष्ट्रप्रथम’ उपक्रमांतर्गत अहिल्यानगरमधील पोलीस परेड मैदानावर (Police Parade Ground) अभूतपूर्व सोहळा पार पडला. शहरातील २५ शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी (Students) यावेळी शिस्तबद्ध संचलन व देशभक्तीपर गीतांवर ताल धरला. विद्यार्थ्यांची ही शिस्त आणि उत्साह पाहून उपस्थित नागरिक व मान्यवर भारावून गेले.
नक्की वाचा: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वज वंदन उत्साहात संपन्न
डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली. हजारो विद्यार्थ्यांची एकाच लयीतील हालचाल पाहून त्यांनी मैदानात जाऊन विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. मुलांचा उत्साह पाहून त्यांनाही फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
अवश्य वाचा: राहुरीत एकाच दिवशी दोन भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू तर तीन जखमी
दादाजी भुसे यांची संकल्पना (Republic Day Parade 2026)
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली केवळ शहरातच नाही, तर जिल्हाभरात हजारो शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.



