Who Is Madhavi Jadhav: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?

0
Who Is Madhavi Jadhav: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?
Who Is Madhavi Jadhav: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?

Who Is Madhavi Jadhav: नाशिक जिल्ह्यात (Nashik News) प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) आयोजित करण्यात आलेला शासकीय कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नाव घेतले नसल्याचे बोलले जात आहे. प्रजासत्ताक दिन असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदाही उल्लेख न केल्यामुळे वन कर्मचारी माधवी जाधव (Madhavi Jadhav) यांनी संताप व्यक्त केला आहे. आता या प्रकरणी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या वन कर्मचारी माधवी जाधव यांनी महाजन यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे.

नक्की वाचा: मी चहावाला ही तर मोदींची ड्रामेबाजी;मल्लिकार्जुन खरगेंच्या विधानावर भाजपने व्यक्त केला संताप 

नेमकं घडलं काय ? (Who Is Madhavi Jadhav)

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणाचा कार्यक्रम सुरु होता. मात्र पालकमंत्री महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव नसल्याचे पाहून माधवी जाधव संतापल्या. त्यांनी थेट व्यासपीठाच्या दिशेने धाव घेत पालकमंत्र्यांना टोकले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले असता, त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. “मला कामावरून काढून टाकले तरी चालेल किंवा सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक मान्य केलीच पाहिजे” असेही त्या ठणकावून म्हणाल्या.

पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन. पण बाबासाहेब ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी”,असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. . वनरक्षक माधवी जाधव यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला

अवश्य वाचा: अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ची प्रेक्षकांना सांगीतिक भेट;’नक्षत्रांचे देणे’ गाणे प्रदर्शित  

माधवी जाधव नेमक्या कोण ? (Who Is Madhavi Jadhav)

माधवी जाधव या शासकीय नोकरी करतात. त्या सध्या वन विभागात वनरक्षक पदावर आहेत. २०११ साली माधवी जाधव भरती झाल्या होत्या. सध्या सिन्नर येथे माधवी जाधव कार्यरत आहेत. या घटने दरम्यान माधवी जाधव यांच्यासोबत दर्शना सौपुरे यादेखील होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घोषणा दिल्या आहेत.

मंत्री गिरीश महाजन यावर काय म्हणाले?

या संपूर्ण घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. गिरीश महाजन म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव माझ्याकडून अनावधानाने राहिले असेल. माझा तसा कुठला हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, त्यात मुद्दामून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाही. मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो, त्यावेळी असे काही होत नाही. मात्र घडलेल्या घटनेबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.