Financial Fraud : भगवान बाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप; शेवगाव पोलिसांत ठेवीदाराची तक्रार

Financial Fraud : भगवान बाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप; शेवगाव पोलिसांत ठेवीदाराची तक्रार

0

Financial Fraud : शेवगाव : भगवान बाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या (Bhagwan Baba Multistate Co-operative Society Limited) बोधेगाव शाखेत (ता. शेवगाव) पदाधिकाऱ्यांनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ठेवीदारांची तब्बल २४ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी बालमटाकळी येथील शेतकरी महेश संभाजीराव लांडे (वय ३४) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात (Shevgaon Police Station) लेखी तक्रार दाखल केली आहे.

नक्की वाचा: मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट बँडची शहिदांना संगीतमय आदरांजली

फिर्यादी मानसिक व आर्थिक अडचणीत

फिर्यादी लांडे यांनी शेतीतून साठवलेली रक्कम संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनी रंगनाथ वैद्य, उपाध्यक्षा मयूर रंगनाथ वैद्य तसेच संचालक मंडळाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मुदत ठेवी स्वरूपात गुंतवली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवहार पारदर्शक असून कोणताही तोटा होणार नाही, तसेच ११ ते १८ टक्के परतावा देण्याची हमी दिली होती. त्यानुसार फिर्यादी, त्यांचे वडील व भाऊ यांच्या नावावर वेगवेगळ्या तारखांना एकूण २४ लाख ७५ हजार रुपयांच्या मुदत ठेवी करण्यात आल्या. मात्र, मुदत संपूनही मुद्दल व व्याजाची रक्कम देण्यास संस्थेचे पदाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. घराची पडझड झाल्याने व तातडीच्या आर्थिक गरजेमुळे पैसे मागितले असता आश्वासने देत वेळकाढूपणा करण्यात आला. यामुळे फिर्यादी मानसिक व आर्थिक अडचणीत सापडला आहे.

अवश्य वाचा: हा सण ऊर्जा आणि प्रेरणा… पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

कठोर कारवाई करण्याची फिर्यादीची मागणी (Financial Fraud)

या प्रकरणात संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून एमपीआयडी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.