Local Crime Branch : नगर : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथून गावठी कट्टा (Country-Made Pistol) व तीन जिवंत काडतुसे बाळगणारा संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज (ता. २७) जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ३८ हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात (Mirajgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?
आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले
संग्राम सुनील जगताप (वय -२३,रा. संतोषनगर, कात्रज, पुणे), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार मिरजगाव (ता. कर्जत) शिवारामध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले ब्रिज खाली एक व्यक्ती विनापरवाना गावठी कट्टा त्याचे कब्जात बाळगून थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार सुनिल खैरे, समीर सय्यद, अशोक रक्ताटे यांच्या मदतीने संशयित आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले.
अवश्य वाचा: अहिल्यानगरच्या पुरुषोत्तम कराड यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर
मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Local Crime Branch)
त्याच्याकडून गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, असा एकूण ३८ हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भाऊसाहेब राजू काळे यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार ऱ्हदय घोडके, भिमराज खर्से, शामसुंदर जाधव, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, महादेव भांड यांच्या पथकाने केली.



