Murder : श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील दत्तनगर मध्ये पत्नीने पतीच्या डोक्यात लाकूड मारत गळा आवळून खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या महिलेचा पती हा दारु पिऊन मारहाण करत तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलत पतीचा खून केला. पोलिसांच्या (Police) तपासात महिलेने खून केल्याची कबुली दिली आहे. रश्मिता मानसकुमार शाहू असे या आरोपी महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी कैलास झिने यांनी सरकारतर्फे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) फिर्याद दिली.
नक्की वाचा: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?
फिर्यादित म्हटले आहे की,
शनिवारी (ता. २४) दत्तनगरचे पोलीस पाटील अनिल गायकवाड यांनी एक मृत व्यक्ती आढळून आल्याचे कळवले. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असता प्रथमदर्शनी मृताच्या डोक्याला मार लागलेला व त्यातुन रक्त निघाल्याचे दिसले. तसेच त्याच्या गळ्यावर उजव्या बाजूला काळ्या रंगाचा व्रण दिसला. अधिक चौकशी केली असता हे घर विजू पटाट यांचे असुन त्यांचे घरी मानसकुमार शाहू हे भाडोत्री राहत असल्याचे समजले. तेथे असलेल्या रश्मिता मानसकुमार शाहु हिच्याकडे चौकशी केली असता तिने मृत व्यक्ती हा तिचा पती असल्याचे सांगुन त्याच्या मृत्यू बाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ती मृत व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेवुन जाण्यास नकार देत तात्काळ अंत्यविधी करण्याचा आग्रह धरत होती. पोलिसांनी मृतदेह साखर कामगार हॉस्पिटल येथे घेवुन गेले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
अवश्य वाचा: अहिल्यानगरच्या पुरुषोत्तम कराड यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर
डोक्यात लाकुड मारुन व गळा आवळुन मारुल्याची कबुली (Murder)
या घटनेबाबत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना सविस्तर माहिती कळवण्यात आली. मृतदेहाचे प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे शवविच्छेदन करण्यात आले. या व्यक्तीच्या मृत्यूबाबत त्याची पत्नी रश्मिता शाहू हिचेकडे पोलीस निरीक्षक देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांनी तिला विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली. तिने सांगितले की, पती मानसकुमार शाहू हा दारु पिवुन मला खूप मारहाण करत असे व सतत संशय घेत असे. त्यामुळे मी त्याच्या डोक्यात लाकुड मारुन व गळा आवळुन मारुन टाकल्याची कबुली दिली. त्यानुसार रश्मिताच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.



