Illegal Sand Mining : श्रीरामपूर : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने (Superintendent of Police Office Team) माळवाडगाव परिसरात अवैध वाळू उपसा (Illegal Sand Mining) करणाऱ्या टिप्परवर कारवाई करत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात (Shrirampur Taluka Police Station) तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सात लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नक्की वाचा: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?
फिर्यादित म्हटले की,
याबाबत पोलीस कर्मचारी सतीश पठारे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले की, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (ता. २४) पोलीस नाईक अनिल शेंगाळे, पोलीस कर्मचारी सचिन शेळके, अनिकेत बर्डे, आयुब शेख यांच्या पथकाने माळवाडगावकडे जाणाऱ्या रस्त्या लगत असलेल्या अडबंगनाथ संस्थान कमानीसमोर सापळा लावला. सकाळी ६.३० च्या सुमारास एक टिप्पर येताना दिसला. पथकाने वाहन चालकाला थांबविण्याचा इशारा केला असता त्याने पोलीस पथकाला पाहून टिप्पर थोड्या अंतरापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. टिप्परमध्ये वाळू मिळून आली.
अवश्य वाचा: अहिल्यानगरच्या पुरुषोत्तम कराड यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर
सात लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Illegal Sand Mining)
या प्रकरणात सुनील छगन रजपूत (वय ३१, रा. वाहेगाव मांजरी ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) व सागर भाऊसाहेब आसणे (वय२९, रा.माळवाडगाव ता. श्रीरामपूर) या दोघांना जेरबंद करण्यात आले. तसेच वाहन मालक ज्ञानेश्वर देविदास बनसोडे (रा.भामाठाण ता. श्रीरामपूर) अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेरबंद आरोपींकडून सात लाख रुपये किमतीचा टिप्पर व १५ हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा सात लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.



