Ajit Pawar Passes Away : पारनेर : महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातील (Politics and Social Issues) एक देदीप्यमान तारा निखळला आहे. राज्याच्या विकासाचे शिल्पकार आणि सामान्य कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ असलेल्या ‘दादां’चे लोकप्रियतेच्या शिखरावर असताना झालेले अकाली निधन (Ajit Pawar Passes Away) संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करून गेले आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?
‘अष्टपैलू’ व्यक्तिमत्व
दादा केवळ एक नेते नव्हते, तर ते शब्दाचे पक्के आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले ‘अष्टपैलू’ व्यक्तिमत्व होते. राज्यातील साखर उद्योगाला शिस्त लावण्यापासून ते राज्याला औद्योगिक प्रगतीकडे नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. शेतकऱ्यांचा तारणहार आणि तमाम लाडक्या बहिणींचा हक्काचा भाऊ म्हणून त्यांनी जनमानसात अढळ स्थान मिळवले होते.

अवश्य वाचा: अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; देवळाली प्रवरा परिसरातून हळहळ व्यक्त
आमदार काशिनाथ दाते ( सर) (Ajit Pawar Passes Away)
एका सामान्य कार्यकर्त्याला आमदारकीपर्यंत पोहोचवण्याचे धाडस आणि पाठबळ फक्त दादाच देऊ शकत होते. “माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी केवळ त्यांच्यामुळेच मिळाली,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये ‘समोर सर्व काही अंधारमय’ झाल्याची भावना आहे. एका पर्वतासारख्या नेतृत्वाला महाराष्ट्र आज जड अंतःकरणाने निरोप देत आहे.
हे देखील वाचा: वायएसआर ते अजितदादा; विमान अपघातात देशाने मोठे नेते गमविले



