Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांसोबत मृत्युमुखी पडलेले ‘ते’ चार जण नेमके कोण?

0
Ajit Pawar Plane Crash:अजित पवारांसोबत मृत्युमुखी पडलेले 'ते' चार जण नेमके कोण?
Ajit Pawar Plane Crash:अजित पवारांसोबत मृत्युमुखी पडलेले 'ते' चार जण नेमके कोण?

नगर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र (Ajit Pawar Plane Crash) हा शोकसागरात बुडाला.आज सकाळी मुंबईहून निघालेले लीयरजेट हे खाजगी विमान बारामतीत उतरण्याच्या प्रयत्नात असताना दाट धुक्यामुळे त्यावरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला. काळाने घात केला आणि या दुर्घटनेत कोणीच वाचले नाही. मात्र बारामतीत झालेल्या या विमान दुर्घटनेत केवळ अजित पवारांचाच नव्हे तर विमानाच्या पायलटसह पाच जणांचा मृत्यू (Five people died) झाला. या विमानातील क्रू मध्ये कॅप्टन सुमित कपूर, विमानाची को-पायलट कॅप्टन शांभवी पाठक,अजित पवारांचे सहकारी विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचेही निधन झाले आहे. आता हे चार जण नेमके कोण आहेत ते पाहू…  

नक्की वाचा: महाराष्ट्र उद्या अजितदादांना अखेरचा निरोप देणार,पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार  

विदीप जाधव कोण ? (Ajit Pawar Plane Crash)

बारामती विमान अपघातात मूळचे साताऱ्याचे असलेले पोलीस विदीप जाधव यांचाही यात मृत्यू झाला. विदीप हे २००९ पासून मुंबई पोलिस सेवेत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि एक मुलगा आणि एक लहान मुलगी असा त्यांचा परिवार होता. ते ठाण्यातील विटावा परिसरामध्ये राहत होते. गेले काही वर्ष अजित पवारांचे बॉडीगार्ड म्हणून ते सावलीसारखे नेहमी त्यांच्यासोबत असायचे. एक शिस्तबद्ध आणि सतर्क अंगरक्षक म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख होती. अजित पवार यांचे दौरे असोत किंवा सार्वजनिक सभा, विदीप जाधव कायम त्यांच्यासुरक्षिततेची जबाबदारी चोख पार पाडत असत. ही घटना घडली तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब ठाण्यातील त्यांच्या विटावा येथील घरात होते. जाधव यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

कॅप्टन सुमित कपूर कोण ? (Ajit Pawar Plane Crash)

कॅप्टन सुमित कपूर हे या विमानाचे मुख्य पायलट होते. सुमित यांना अनेक वर्षांचा विमान चालवण्याचा अनुभव होता. सुमीत कपूर हे अपघातग्रस्त विमानाचे पायलट इन कमांड म्हणून काम पाहत होते. फ्लाईट क्रूचे नेतृत्व तेच करत होते. टेक ऑफ आणि लँडिंगचे नेतृत्वही त्यांच्याकडे होते. त्यांना विमान उड्डाणाचा बराच अनुभव होता, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच या  हे विमान उड्डाणासाठी १०० टक्के सुरक्षित होते, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तब्बल १६,००० तासांहून अधिक उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे या विमानाची धुरा होती. सहारा, जेट एअरवेज सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेले कपूर हे या क्षेत्रातील दिग्गज मानले जात होते. त्यांचा मुलगाही याच कंपनीत वैमानिक आहे.

अवश्य वाचा: अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा;देवेंद्र फडणवीस यांची घोषणा   
पिंकी माळी

फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या २९ वर्षाच्या होत्या. गेल्या सहा वर्षापासून त्या फ्लाईंग क्षेत्रामध्ये काम करत होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या व्हीएसआर कंपनीमध्ये त्या कार्यरत होत्या.यापूर्वी त्या  सांताक्रुज इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये काम केलं आहे. त्या मूळच्या उत्तर प्रदेश जौनपूरच्या होत्या. मात्र गेले तीन पिढ्या माळी कुटुंबीय मुंबईत वरळी सेंचुरी मिल परिसरामध्ये वास्तव्याला होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. सध्या पतीसह त्या ठाण्यात राहत होत्या. वरळी येथील आई-वडिलांच्या घरी त्या येऊन जाऊन असत. त्यांच्या पश्चात पती, वडील शिवकुमार माळी, आई आणि एक लहान भाऊ आहे. त्यांचे पती एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. घरच्यांच्या  इच्छेखातर त्यांनी हे क्षेत्र निवडलं. मात्र पिंकी यांना मॉडलिंगची देखील खूप आवड होती असे कुटुंबीय सांगतात.

शांभवी पाठक

या विमान दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या को-पायलट शांभवी पाठक या विमानाच्या सहपायलट होत्या. त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. ग्वालियरमधील वायु सेना बाल भारती स्कूलमधून त्यांनी हे शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातून ‘एरोनॉटिक्स’ (वैमानिकी) या विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी न्यूझीलंडमधील एका प्रसिद्ध व्यावसायिक पायलट अकादमीत प्रशिक्षण घेतले.२०१९ पर्यंत त्यांनी भारत आणि न्यूझीलंडचे कमर्शियल पायलट लायसन्स मिळवले होते. पायलट होण्याबरोबरच त्या इतर उमेदवार पायलट्सना प्रशिक्षण देण्याचे कामही मध्य प्रदेश फ्लायंग क्लबमध्ये करत होत्या. २०२२ पासून VSR Venture प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फर्स्ट ऑफिसर पदावर त्या कार्यरत होत्या. याच कंपनीच्या माध्यमातून त्या वैमानिक, पायलट म्हणून सेवा देत होत्या. शांभवी यांना एव्हिएशन सेक्युरिटी स्पाईसजेटकडून परवाना देण्यात आला होता. त्यांचे  वडील सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत होते. तसेच शांभवी पाठक यांना १५०० तास विमान उड्डणांचा तासांचा अनुभव होता.