Assault With a Deadly Weapon : घरफोडी करून धारदार शस्त्राने मारहाण; दोन संशयित आरोपी जेरबंद

Assault With a Deadly Weapon : घरफोडी करून धारदार शस्त्राने मारहाण; दोन संशयित आरोपी जेरबंद

0
Assault With a Deadly Weapon : घरफोडी करून धारदार शस्त्राने मारहाण; दोन संशयित आरोपी जेरबंद
Assault With a Deadly Weapon : घरफोडी करून धारदार शस्त्राने मारहाण; दोन संशयित आरोपी जेरबंद

Assault With a Deadly Weapon : नगर: नवनागापूर परिसरात पहाटे घरामध्ये घुसून महिलेला धारदार हत्याराने मारहाण (Assault With a Deadly Weapon) करून सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे दोन लाख ४० हजार रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना (Hardened Criminal) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने जेरबंद केले आहे. अनिता सुखदेव काळापहाड (वय ३५, रा. तलाठी कार्यालयामागे, साईराजनगर, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) फिर्याद दाखल केली होती.

नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?

२ लाख ४० हजारांच्या मुद्देमालाची जबरी चोरी

२२ जानेवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास, त्या घरात झोपलेल्या असताना दोन अनोळखी इसमांनी विनापरवानगी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. धारदार हत्याराने त्यांना मारहाण करून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम असा सुमारे दोन लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल जबरी चोरी करून पळ काढला होता.

गुन्हेगारांवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे (Assault With a Deadly Weapon)

या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा प्रेम नरेंद्र भाकरे (वय २२, रा. नागापूर गावठाण) व अनिकेत उमेश साठे (वय २१, रा. पितळे कॉलनी, नागापूर) यांनी मिळून केला आहे. संशयित आरोपी नागापूर परिसरात असल्याची माहिती मिळताच तत्काळ तपास पथक रवाना करण्यात आले. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही संशयित आरोपींना नागापूर परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव हे करीत आहेत. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

ही कारवाई सहायक निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद परदेशी, उपनिरीक्षक मनोज मोंढे, उपनिरीक्षक विकास जाधव, अंमलदार राकेश खेडकर, राजू सुद्रिक, संदीप पवार, सचिन आडबल, नवनाथ दहिफळे, राजेश राठोड, अक्षय रोहोकले, सुरज देशमुख, ज्ञानेश्वर आघाव, राहुल गुंड्ड यांच्या पथकाने केली.