
नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर (District Council Election) याचा परिणाम होणार नाही. या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार (The elections will be held as per schedule) असल्याची माहिती निवडणूक आयोगातील (Election Commission) सूत्रांनी दिली आहे. निवडणूक काळात राज्याच्या प्रमुखपदावरील व्यक्तीचे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे अशा प्रकारे निवडणूक रद्द करण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश निवडणूक नियमांमध्ये नाही. त्यामुळे निवडणुकीच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही, असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले आहे.
नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?
निवडणूक प्रचार काळात एखाद्या उमेदवाराचा आकस्मिक मृत्यू झाला तर संबंधित मतदारसंघातील निवडणूक स्थगित करण्याची पूर्वी प्रथा होती. मात्र, कालांतराने यात बदल करून ही पद्धत रद्द करण्यात आली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने निवडणूक स्थगित होणार का ? याबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
निवडणुकीचा नियम काय सांगतो ? (ZP Election Update)

निवडणूक अधिनियमानुसार, मतदानासाठी निश्चित करण्यात आलेली तारीख राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्व परवानगी शिवाय मतदानाच्या दिवसांपूर्वीच्या सात दिवसांत बदलता येत नाही. मात्र, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मतदानाचा दिवस बदलणे आवश्यक आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांचे मत झाल्यास, राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांच्या अधीन राहून असा बदल करता येतो. त्याचबरोबर राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील शासकीय दुखवट्याचा कालावधी घोषित केलेला असेल आणि याच काळात मतदान होणार असेल, तर मतदानाच्या दिवसात बदल करता येऊ शकतो, अशी तरतूद निवडणूक अधिनियमात आहे.
अवश्य वाचा: अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा;देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेळापत्रकानुसारच होणार (ZP Election Update)
मात्र, सार्वजनिक हिताला बाधा येईल अशी कोणतीही परिस्थिती सध्या नाही. तसेच,अजित पवार यांच्या निधनाने जाहीर केलेला तीन दिवसांच्या दुखवट्याचा कालावधी ३० जानेवारीला संपत आहे. त्यामुळे, या दोन्ही शक्यता नसल्याने निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगातील सूत्रांच्या माहितीनुसार, अद्याप तरी असा कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच निवडणूक नियमांमध्ये अशी तरतूद नसल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या पातळीवर असा कोणताही निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


