Fraud : अहिल्यानगर एमआयडीसीत व्यवसायिकाची ८४ लाखांची फसवणूक

Fraud : अहिल्यानगर एमआयडीसीत व्यवसायिकाची ८४ लाखांची फसवणूक

0
Fraud : अहिल्यानगर एमआयडीसीत व्यवसायिकाची ८४ लाखांची फसवणूक
Fraud : अहिल्यानगर एमआयडीसीत व्यवसायिकाची ८४ लाखांची फसवणूक

Fraud : नगर : एका नामांकित कंपनीचे डीलर असल्याचे भासवून नागापूर एमआयडीसी (Nagapur MIDC) येथील एका कंपनीची तब्बल ८४ लाख ५८ हजार ४३० रूपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) जे. अँड एस. पॉवर सोल्यूशन कंपनीच्या मालकांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत बजाज पॉवर इक्वीपमेंटस प्रा. लि. कंपनीचे मॅनेजर बाबासाहेब शंकर बनकर (वय ४५, रा. हनुमाननगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

नक्की वाचा: अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राचा उमदा नेता गमावला – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

कंपनीचे अधिकृत विक्रेते असल्याचे सांगितले

प्रसन्ना जी. एम., सुष्टीश्री प्रसन्ना (जेएस पॉवर सोलुशन कंपनीचे मालक) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बनकर हे बजाज पॉवर इक्विपमेंट्स प्रा. लि. कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. मे २०२५ पासूनसंशयित आरोपींनी बनकर यांचा विश्वास संपादन करण्यास सुरूवात केली होती. प्रसन्ना जी. एम. आणि सृष्टीश्री प्रसन्ना यांनी आपण क्रॉम्प्टन कंपनीचे अधिकृत विक्रेते असल्याचे बनकर यांना सांगितले. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर पुरवठा करण्याच्या नावाखाली त्यांनी बनकर यांच्याकडून वेळोवेळी आरटीजीएसव्दारे ८४ लाख ५८ हजार ४३० रूपये स्वीकारले.

अवश्य वाचा: अजित पवारांसोबत मृत्युमुखी पडलेले ‘ते’ चार जण नेमके कोण?

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव (Fraud)

दरम्यान, मोठी रक्कम घेऊनही संशयित आरोपींनी संबंधित कंपनीला ट्रान्सफॉर्मर दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बनकर यांनी एमआयडीसी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. या घटनेचा तापास उपनिरीक्षक परदेशी हे करत आहेत.