Financial fraud : पैसे दुप्पटच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Financial fraud : पैसे दुप्पटच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Financial fraud : पैसे दुप्पटच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Financial fraud : पैसे दुप्पटच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Financial fraud : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव (Kamargaon) येथील शेतकऱ्यासह गावातील ४० ते ५० नागरिकांची आर्थिक फसवणूक (Financial fraud) झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पोस्ट ऑफिसमधील (Post Office) फिक्स-डिपॉझिट व विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतील, असे आमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा: अजितदादांच्या खुर्चीवर सुनेत्रा वहिनी बसणार का? नरहरी झिरवाळ यांच्या मागणीने राजकीय चर्चांना उधान

नागरिकांचा विश्वास संपादन

याबाबत सुखदेव दगडू ठोकळ (वय ५३, रा. कामरगाव) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बबन साहेबराव शेलार (मुळ रा. गुंफा, भातकुडगाव, ता. शेवगाव, सध्या रा. फत्तेपुर, ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बबन शेलार याने ६ जुलै २०२४ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत कामरगाव पोस्ट ऑफिस येथे फिर्यादी सुखदेव ठोकळ व इतर नागरिकांचा विश्वास संपादन करून शेलार याने पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये फिक्स डिपॉझिट व इतर योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट होईल, असे सांगून फिर्यादी कडून नऊ लाख रूपये घेतले.

अवश्य वाचा: अजित पवार यांचं ६ क्रमांकाशी नेमकं कनेक्शन’ काय? जाणून घ्या…

बनावट नोंदी करून विश्वासघात (Financial fraud)

मात्र, या रकमेच्या बदल्यात बनावट नोंदी करून विश्वासघात केला व आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.