NCP (Ajit Pawar) : राष्ट्रवादीच्या प्रमुख तीन नेत्यांच्या वर्षावर जाण्याने हालचालींना वेग

NCP (Ajit Pawar) : राष्ट्रवादीच्या प्रमुख तीन नेत्यांच्या वर्षावर जाण्याने हालचालींना वेग

0
NCP (Ajit Pawar) : राष्ट्रवादीच्या प्रमुख तीन नेत्यांच्या वर्षावर जाण्याने हालचालींना वेग
NCP (Ajit Pawar) : राष्ट्रवादीच्या प्रमुख तीन नेत्यांच्या वर्षावर जाण्याने हालचालींना वेग

NCP (Ajit Pawar) : नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर (Deputy Chief Minister Ajit Pawar dies in an accident) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (एनसीपी) (NCP (Ajit Pawar)) नेतृत्व कोणाकडे जाईल, उपमुख्यमंत्रीपदावर (Deputy Chief Minister post) कोण विराजमान होईल आणि त्यांच्याकडील महत्वाच्या खात्यांचे वाटप कसे होईल, यावर चर्चा सुरू झाल्या आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेण्यासाठी दाखल झाले आहे. अजित पवारांकडील खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावीत, अशी मागणी या भेटीदरम्यान करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

नक्की वाचा: अजितदादांच्या खुर्चीवर सुनेत्रा वहिनी बसणार का? नरहरी झिरवाळ यांच्या मागणीने राजकीय चर्चांना उधान

पक्षाच्या भविष्याबाबत चर्चा सुरु

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून पक्षाचे नेतृत्व केले असून, महाविकास आघाडी ते महायुती सरकारमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरली. आता पक्षाच्या भविष्याबाबत चर्चा सुरु झाल्या असून त्यात शरद पवार गटाशी विलीनीकरणाच्या चर्चानाही वेग आला आहे. एनसीपीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अजित पवारांच्या खात्यांचे वाटप पक्षाकडेच राहावे, अशी मागणी केली असल्याचे समोर आले आहे. याबाबत पक्षाकडून अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.

अवश्य वाचा: अजित पवार यांचं ६ क्रमांकाशी नेमकं कनेक्शन’ काय? जाणून घ्या…

अजित पवार यांच्याकडे असलेली महत्वाची खाती (NCP (Ajit Pawar))

वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण (अतिरिक्त जबाबदारी), अल्पसंख्याक विकास आणि औकाफ (अतिरिक्त जबाबदारी). ही खाती महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. वित्त आणि नियोजन खाते हे राज्याच्या बजेट आणि विकास योजनांशी निगडीत असून, राज्य उत्पादन शुल्क हे महसूलाचे प्रमुख स्रोत आहे. क्रीडा आणि युवक कल्याण खाते युवकांच्या विकासासाठी तर अल्पसंख्याक विकास खाते सामाजिक न्यायासाठी महत्वाचे आहे. त्यासोबत अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. बीड जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्याकडे होती.


पुणे जिल्ह्यात त्यांनी अनेक विकासकामांना गती दिली असून, त्यांच्या अनुपस्थितीत या जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे सदर खाती राष्ट्रवादीकडेच असावी मागणी केली असल्याचे समजते.

एनसीपीच्या नेत्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे. प्रफुल्ल पटेल हे केंद्रातील प्रभावी नेते असून, सुनील तटकरे प्रदेश पातळीवर पक्ष संघटना सांभाळतात. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास बैठक चालली. काही वेळापुर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे देखील वर्षावर दाखल झाले होते. या तिघांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने पक्ष एकजुटीने पुढे जाईल, असा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री पदासाठी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाचा प्रस्तावावर देखील चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, पक्षांतर्गत गटबाजी आणि महायुतीतील भागीदार पक्षांच्या अपेक्षा यामुळे खातेवाटप सोपे नसेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नावाला विरोध नाही – प्रफुल्ल पटेल

  • उपमुख्यमंत्री पदा बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
    यासोबतच आज किंवा उद्या सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. जय पवार आणि पार्थ पवार यांच्याशीही संवाद साधणार असून, सर्व आमदारांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
    सुनेत्रा पवार यांच्या नावाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या आणि जनतेच्या भावना आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे. त्या भावनांचा आदर राखूनच योग्य निर्णय घेतला जाईल, तसेच त्यांच्या नावाला विरोध नाही असे देखील सांगायला प्रफुल पटेल विसरले नाही.

अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाच्या एकीकरणाबाबतही चर्चा सुरु आहेत तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाशी विलीनीकरण होईल की नवे नेतृत्व उभे रहाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.