
Regional Transport Office :नगर : मोटार वाहन कायद्यान्वये (Motor Vehicles Act) थकीत कर व दंडाच्या वसुलीसाठी, तसेच विविध गुन्ह्यांतर्गत जप्त (Seized vehicle) करण्यात आलेल्या एकूण १५ वाहनांचा जाहीर ई-लिलाव(E-auction of vehicles) प्रादेशिक परिवहन कार्यालय (Regional Transport Office), अहिल्यानगर यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
नक्की वाचा: अजितदादांच्या खुर्चीवर सुनेत्रा वहिनी बसणार का? नरहरी झिरवाळ यांच्या मागणीने राजकीय चर्चांना उधान
संकेतस्थळावर लिलावाकरिता ऑनलाइन उपलब्ध
लिलावात समाविष्ट असलेली ही सर्व वाहने शहर वाहतूक नियंत्रण शाखा (पोलीस विभाग), अहिल्यानगर यांच्या वाहनतळावर ठेवण्यात आली आहेत. ही १५ वाहने www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर लिलावाकरिता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असतील. सदर वाहनांची विक्री ‘स्क्रॅप’ (भंगार) स्वरूपात करण्यात येणार असल्याने, या प्रक्रियेत केवळ नोंदणीकृत संस्थांनाच सहभाग घेता येईल. लिलावाकरिता संकेतस्थळावर प्रसिद्ध असलेल्या अटी व शर्ती लागू राहतील.
हे देखील वाचा: दादा…तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
अन्यथा लिलाव प्रक्रिया पूर्ण केली जाणार (Regional Transport Office)
संबंधित वाहन मालक, चालक, वित्तपुरवठादार अथवा हितसंबंधितांनी लिलावाच्या दिनांकापूर्वी शासकीय महसूल भरून आपली वाहने सोडवून घ्यावीत. अन्यथा लिलाव प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कोणतेही कारण न देता सदर जाहीर लिलाव रद्द करण्याचा अथवा तहकूब ठेवण्याचा अधिकार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने राखून ठेवला असल्याचे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी कळविले आहे.


