Ahilyanagar Police | अहिल्यानगरच्या वाहतूक पोलिसांची काळ्या काचांवर नजर; १३६ चारचाकींवर कारवाई

0

Ahilyanagar Police | नगर : चारचाकी वाहनांना विशेषतः कारच्या काचांना काळी फिल्म बसविण्याचे चलन वाढू लागले आहे. यातूनच वाहन अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन करणे सोपे जाते, सीटबेल्ट लावला अथवा नाही हे कळत नाही. त्यामुळे पोलिसांना कारवाईत अनेक अडचणी येतात. त्यामुळे शासनाने वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म बसविण्याला मनाई केली आहे. तरीही काही जण काच काळ्या करतात, अशा वाहन चालकांवर कारवाईची मोहीम अहिल्यानगर पोलीस (Ahilyanagar Police) प्रशासनाने हाती घेतली आहे. 

हेही वाचा – जप्त केलेल्या १५ वाहनांचा ई – लिलाव; अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती

१ लाख २८ हजारांचा दंड (Ahilyanagar Police)

अहिल्यानगरच्या शहर वाहतूक शाखेने काळी फिल्म लावणाऱ्या चारचाकी विरोधात मोहीम उघडली आहे. त्यांना अवघ्या दोन दिवसांत १३६ चारचाकींवर कारवाई केली. यात काळी फिल्म लावणाऱ्या चारचाकी वाहन मालकांकडून १ लाख २८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेबाबत अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी माहिती दिली. 

अवश्य वाचा – बौद्ध समाजातील संस्थांच्या पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना; २० फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या पथकाची कारवाई (Ahilyanagar Police)

पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (ता. २८) ठिकठिकाणी नाकाबंदी केली. यावेळी अनेक चारचाकी वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म लावल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी काळ्या फिल्म लावणाऱ्या चारचाकी थांबवून कारवाई केली. काही वाहनांच्या काचांवरील काळ्या फिल्म पोलिसांनी काढून टाकल्या आहेत. अशा फिल्म लावल्याने चारचाकीमध्ये कोण आहे, ते दिसत नाहीत. वाहनांच्या काचावर काळ्या फिल्म लावण्यास बंदी आहे. ही वाहने विविध गुन्हे करण्यासाठी वापरले जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे काळ्या काचा काढून टाकण्याची मोहीम वाहतूक शाखेने हाती घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here