Halwa Ceremony:अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी हलवा समारंभ का आयोजित केला जातो? 

0
Halwa Ceremony:अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी हलवा समारंभ का आयोजित केला जातो? 
Halwa Ceremony:अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी हलवा समारंभ का आयोजित केला जातो? 

Halwa Ceremony: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) येत्या रविवारी म्हणजेच १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प (Budget 2026) सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.मात्र या अर्थसंकल्पापूर्वी दरवर्षी अर्थमंत्र्यांकडून हलवा समारंभ (Halwa Ceremony)आयोजित केला जातो. मात्र त्यामागचा हेतू काय, तो का केला जातो? हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. चला सविस्तर जाणून घेऊयात…

नक्की वाचा: महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल!गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट

हलवा पद्धत नेमकी काय ? (Halwa Ceremony)

कोणत्याही शुभ कार्याची सुरवात ही गोड पदार्थाने करण्याची भारतीय परंपरा आहे.अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीही असाच हलवा समारंभ आयोजित केला जातो. अर्थसंकल्पीय कागदपत्रे छापायला जाण्यापूर्वी हा हलवा समारंभ केला जातो. त्यानंतर अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांसाठी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी  लॉक-इन कालावधीसुरु होतो, जो १ फेब्रुवारीपर्यंत लोकसभेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत चालू राहतो. हलवा समारंभ सामान्यतः केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक आठवडा आधी आयोजित केला जातो. याच दरम्यान अर्थसंकल्पाविषयी कोणतीही माहिती लीक होऊ नये, यासाठी बजेटच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कडक नजर ठेवली जाते.अर्थमंत्र्यांनाही यावेळी सर्व कडक नियमांचे पालन करावे लागते.

अवश्य वाचा: आता राष्ट्रवादीचा दादा कोण?राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार?
हा समारंभ अर्थमंत्री आणि अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी अधिकाऱ्यांमधील एक कृतज्ञतेचे प्रतीक आहे. तसेच अर्थसंकल्प तयार करणाऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा सन्मान करण्यासाठी आणि या संकल्पनेची गुप्तता सुनिश्चित करण्यासाठी देखील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या समारंभात अर्थ मंत्रालयाच्या स्वयंपाकघरातील एका मोठ्या पॅनमध्ये हलवा तयार केला जातो. अर्थमंत्री स्वतः हा हलवा अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देतात. माहितीनुसार, हा हलवा पीठ आणि रव्यापासून बनवला जातो. त्यात तूप आणि सुकामेवा मिसळले जातात.

‘लॉक-इन’ कालावधी नेमका कसा असतो ? (Halwa Ceremony)

या समारंभानंतर अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व अधिकारी ‘लॉक-इन’ कालावधीत प्रवेश करतात. म्हणजेच या अधिकाऱ्यांना कोणाशीही संपर्क साधता येत नाही. सहसा, बजेट अधिकारी आणि कर्मचारी नॉर्थ ब्लॉकच्या तळघरासारख्या सुरक्षित ठिकाणी राहतात. या काळात ते सतत बजेटवर काम करतात. त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना भेटण्याची किंवा फोन करण्याची परवानगी या लॉक इन कालावधीत नसते.

हलवा सेरेमनी झाल्यानंतर अधिकाऱ्यांना मोबाईल फोन किंवा इंटरनेट वापरण्यासही बंदी घालण्यात येते. या सर्व उपाययोजनांचे मुख्य कारण म्हणजे अर्थसंकल्प कोणत्याही प्रकारे लीक होणार नाही, याची काळजी घेणे असत. या समारंभानंतर पंतप्रधानांची मंजुरी घेतली जाते, त्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे छपाईसाठी पाठविली जातात. ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी गुप्तचर विभागाकडून वेळोवेळी मंत्रालयाच्या तळघरात असलेल्या प्रिंटिंग प्रेसची तपासणी केली जाते. त्यामुळे दरवर्षी हा हलवा समारंभ बजेट मांडण्यापूर्वी खास ठरतो.