ADCC Bank | अहमदनगर जिल्हा बँकेच्या सायबर सुरक्षा उपाययोजनांबाबत नाबार्डकडून समाधान

0

ADCC Bank | नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या (ADCC Bank) सायबर सुरक्षा उपाययोजनांबाबत नाबार्डकडून (NABARD) समाधान व्यक्त करण्यात आले. बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय सायबर सुरक्षा प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणास नाबार्डचे डी.जी.एम.संजीव कुमार, निलेश शुक्ला, व्हीव्हीएस तेजा, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे व बँक अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – अहिल्यानगरमध्ये नायब तहसीलदाराची रेल्वे खाली आत्महत्या; महसूल प्रशासनात खळबळ

नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले (ADCC Bank)

बँकिंग क्षेत्रातील वाढते सायबर धोके लक्षात घेता, नाबार्डमार्फत नुकतेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे तीन दिवसीय ‘आयटी एक्झामिनेशन’ (IT Examination) पूर्ण करण्यात आले. या तपासणीमध्ये बँकेने सायबर सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजना आणि राबवलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे.

अवश्य वाचा – पिसाळलेल्या कुत्र्याने १३ जणांना घेतला चावा; कर्जतच्या डायनॅमिक शाळेतील प्रकार

सायबर सुरक्षेचा सविस्तर आढावा (ADCC Bank)

 नाबार्डच्या वतीने करण्यात आलेल्या या तीन दिवसीय तपासणीमध्ये बँकेच्या आयटी प्रणालीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये सायबर सिक्युरिटी कंप्लायन्स, तांत्रिक सुरक्षा उपाय आणि बँकेने सुरक्षित व्यवहारांसाठी राबवलेली नवीन प्रणाली यांचा प्रामुख्याने समावेश होता. बँकेने नियमांनुसार सर्व तांत्रिक मानकांची पूर्तता केल्याचे यावेळी दिसून आले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण (ADCC Bank)

या तपासणीचाच एक भाग म्हणून, शुक्रवारी (ता. ३०) जिल्हा बँकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘एकदिवसीय ऑनलाइन सायबर सिक्युरिटी अवेयरनेस’ (Cyber Security Awareness Training) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात नाबार्डच्या तज्ज्ञांनी सायबर हल्ल्यांपासून बँकिंग व्यवहार कसे सुरक्षित ठेवावेत, फिशिंग आणि ऑनलाइन फसवणूक कशी ओळखावी, तसेच दैनंदिन कामकाजात कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बँकेने तंत्रज्ञानाचा वापर करताना ग्राहकांच्या हिताला आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नाबार्डकडून मिळालेली ही दाद बँकेच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here